rabi season crops were destroyed due to unseasonal rain in dondaicha dhule news esakal
उत्तर महाराष्ट्र

Unseasonal Rain : दोंडाईचात काढणीस आलेल्या पिकांचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

दोंडाईचा (जि. धुळे) : परिसरात तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम आहे. सोमवारी (ता. ६) सायंकाळी साडेचारनंतर आकाशात ढग भरून आले. वादळी वाऱ्यासह अवकाळी (unseasonal rain) पावसाने हजेरी लावली. (rabi season crops were destroyed due to unseasonal rain in dondaicha dhule news)

त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना फटका बसला आहे. सुमारे अर्धा तास वादळ, विजांचा लखलखाट, ढगांचा गडगडाट सुरू होता. त्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली होती. रब्बी हंगामाचे उत्पादन हाती येण्यापूर्वीच तीन दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे.

गहू, हरभरा, मका या काढणीस आलेल्या पिकांचे नुकसान झाले. त्याचा उत्पन्नावर परिणाम होणार आहे. शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

शनिवारी सायंकाळी शिंदखेडा तालुक्यातील दहापेक्षा जास्त गावांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामात सुमारे दीडशे हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले.

सोमवारी दोंडाईचा, मालपूर, सुराय अक्कलकोस परिसरात सुसाट वेगाने वारा सुटलेला होता. दरम्यान, तुरळक पावसाचा शिडकाव झाला. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel-Hamas Ceasefire Broken: ‘’गाझावर पूर्ण ताकदीने हल्ला करा...’’ ; नेतान्याहू यांनी लष्कराला दिले आदेश!

Prashant Kishor Notice : बिहार निवडणुकीआधी प्रशांत किशोर यांना धक्का! ; निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ जसलोक रुग्णालयात दाखल

Deglur News : मराठवाडा साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष बाबू बिरादार यांचे दुःखद निधन; धनगरवाडीत अंत्यसंस्कार

सोशल मीडियावरील घटस्फोटाच्या चर्चा खऱ्या की खोट्या? सौरभपासून वेगळं होण्यावर योगिता चव्हाणने दिली प्रतिक्रिया, काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT