Jayakumar Rawal, Dr. present after changing the name of Rahimpure village . Subhash Bhamre, Narayan Patil and villagers. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : रहीमपुरेचे नामकरण आता रामनगर

अयोध्या येथे श्रीराम मंदिर नवनिर्माण आणि सोमवारी (ता. २२) मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिंदखेडा तालुक्यातील रहीमपुरे या गावाचे नाव आता रामनगर होणार असल्याचा ऐतिहासिक ठराव येथील ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने केला.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : पाचशे वर्षांनंतर अयोध्या येथे श्रीराम मंदिर नवनिर्माण आणि सोमवारी (ता. २२) मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिंदखेडा तालुक्यातील रहीमपुरे या गावाचे नाव आता रामनगर होणार असल्याचा ऐतिहासिक ठराव येथील ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने केला.

या नामांतरासाठी शासनस्तरावर यथोचित सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही आमगार जयकुमार रावल यांनी दिली. (Rahimpure is now renamed as Ramnagar dhule news)

रहीमपुरे येथे विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा झाला. यात आमदार निधीतून साकारलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीचे उद्‍घाटन, दोन काँक्रिट रस्त्यांचे लोकार्पण.

श्री महादेव मंदिर सामाजिक सभागृहाची पायाभरणी, आरओ फिल्टर प्लांटचे लोकार्पण आदींचा सामावेश होता. खासदार डॉ. सुभाष भामरे अध्यक्षस्थानी होते.

बाजार बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, शिरपूर साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व्ही. यू. पाटील, पंचायत समिती सभापती रणजित गिरासे.

माजी नगराध्यक्ष विक्रम पाटील, प्रभाकर पाटील, सरपंच क्रांती अरुण पाटील, उपसरपंच आशाबाई पाटील, दुल्लभ सोनवणे, नारायण गिरासे, विक्रम तायडे, विखुर्लेचे सरपंच गुलाब पाटील, व्ही. डी. पाटील, विखरणचे सरपंच महेंद्र पवार, वैभव निकम, सोनशेलूचे सरपंच प्रियांका बडगुजर, कुरकवाडेचे सरपंच प्रकाश पाटील.

जोगशेलूचे उपसरपंच किरण पाटील, सुरेश पाटील, माजी सरपंच पिंटू तिरमले, विनोद पाटील, अशोक पाटील, अधिकार पाटील, गोपाल भिल, सुरेश रामराजे, दगाजीराव पाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident : दोन दिवस जेवलो नाही, खूप शोधलं पण... ताम्हिणी घाटातील अपघाताचे दृश्य पाहून मृत तरुणांचे मित्र ढसाढसा रडले

Mangalwedha News : कात्राळचे शहीद जवान बाळासाहेब पांढरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Pachod Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण जागीच ठार; पाचोड पैठण रस्त्यावरील घटना

Delhi Mumbai Express way : दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे वर आता हेलिकॉप्टरची सेवा; अपघातातील जखमींना एअरलिफ्ट करता येणार, पर्यटनालाही चालना

Latest Marathi News Update : देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT