Pimpalner: Snake friends while releasing a rare cat snake into the forest. In the second photo, a rare cat snake. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : पिंपळनेर येथे आढळला दुर्मिळ जातीचा मांजऱ्या साप

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : येथील सामोडे चौफुलीजवळील अविनाश जगताप यांच्या विजय मेन्स पार्लर दुकानाच्या शटरमध्ये मांजऱ्या जातीचा निमविषारी साप आढळला.

दुकानमालक जगताप यांनी ही माहिती वन्यजीव संरक्षण संस्था, पिंपळनेर यांना दिली.

माहिती मिळताच वन्यजीव संरक्षण संस्थेचे सर्पमित्र घटनास्थळी दाखल झाले व मांजऱ्या जातीचा सापाला सुरक्षितरीत्या पकडण्यात आले. (rare cat snake found in Pimpalner Sarpmitra left in forest after medication dhule news )

हा साप निमविषारी प्रकारातील असून, याचे विष मानवास हानिकारक नसून तो शिकार करण्यासाठी हे विष वापरत असतो, तसेच हा साप दुर्मिळ असून, अगदी कमी प्रमाणात आढळत असतो.

सापाच्या डोळ्यांची बाहुली मांजरीच्या डोळ्यांसारखी उभी असते. यावरून याला मांजऱ्या नाव पडले, अशी माहिती सर्पमित्रांनी दिली.

हा साप शटरमध्ये अडकून जखमी झाला असल्याने त्याच्यावर उपचार करण्यात आले व वन विभागात नोंद करून जंगलात सोडण्यात आले. या वेळी वन्यजीव संरक्षण संस्थेचे सर्पमित्र प्रमोद गायकवाड, दानिश पटेल, राकेश मोरे आदी उपस्थित होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Latest Maharashtra News Updates : मध्य वैतरणा धरणाचे तीन दरवाजे उघडले, लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT