Ration-Card
Ration-Card 
उत्तर महाराष्ट्र

रेशन दुकानदारांची पोलखोल

रोशन भामरे

नाशिक - रेशन दुकानातील धान्याच्या काळ्या बाजाराला लगाम घालण्यासाठी शासनाने बायोमेट्रिक प्रणाली सुरू केली; मात्र त्यातही काही दुकानदारांनी सर्व्हरची मेख मारून हस्तलिखित आकड्यांचा गोंधळ घातला आहे. त्यामुळे आता सरकारने याहीपुढे जाऊन लाभार्थींना दर महिन्याला किती धान्य मिळाले, याची माहिती देणारी वेबसाईट उपलब्ध केली आहे. दरम्यान, संबंधित वेबसाईटचा मेसेज व्हॉट्‌सॲप ग्रुपवरून व्हायरल झाल्याने अनेक गावांत रेशन दुकानदारांची पोलखोल सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.

आपल्या गावात आपण रेशन दुकानातून रेशन घेतो; परंतु रेशन दुकानदार आपल्याला पावती मात्र देत नाही. अनेकदा सर्व्हर डाऊन झाले म्हणून तो पावतीच्या मागच्या बाजूला पेनाने आकडे लिहून तसे धान्य वाटप करतो. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने लोकांना त्यांच्या पावत्या ऑनलाईन पाहता येण्यासाठी एक वेबसाईट चालू केली आहे.

आपण http://mahaepos.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपला दहाअंकी आरसी क्रमांक जो रेशन घेताना बायोमेट्रिकसाठी येतो किंवा आपल्या रेशनकार्डवरील असतो तो क्रमांक यामध्ये टाकावा लागतो. त्यानंतर आपल्या कुटुंबातील सदस्यांची नावे, महिन्याला कोणी रेशन आणले त्याचे नाव, त्याला किती गहू व तांदूळ दिले याची माहिती निदर्शनास येत आहे. याशिवाय आपल्या गावातील रेशन दुकानदाराने गावासाठी किती माल आणला आहे, हेदेखील ही संकेतस्थळ दाखविते. या वेबसाईटवर प्रत्येक महिन्यात पावतीवरील धान्य आणि प्रत्यक्षात दुकानदाराने दिलेले धान्य यामध्ये तफावत आढळल्यास यासाठी तक्रार देण्यासाठीही एक संकेतस्थळ तसेच १८००-२२-४९५० व १९६७ या क्रमांकावर टोल फ्री सुविधा आहे.

बायोमेट्रिक प्रणालीमुळे आपल्या नावावर शासनाकडून किती धान्य येते आणि आपल्याला किती धान्य मिळते हे आपल्या मोबाईलवर समजत असल्यामुळे धान्याचा काळाबाजार कमी होणार असून, सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळणार आहे.
- पंकज ठाकरे, तळवाडे दिगर

२०१५ नंतर काढलेल्या नवीन शिधापत्रिकाधारकांना अजूनदेखील स्वस्त धान्य मिळत नसून त्यांनादेखील धान्य मिळावे, या वर्षी दुष्काळामुळे कोणत्याही प्रकारचे धान्य पिकले नाही. यामुळे नवीन शिधापत्रिकाधारकांनाही धान्य मिळेल याची तरतूद शासनाने करावी.
- अविनाश धोंडगे, नवीन रेशन कार्डधारक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT