Delhi: While discussing with Union Minister of State for Agriculture Kailas Chaudhary, Adv. Prakash Patil etc esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : कृषिकर्जाचा व्याजदर कमी करा; केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचे निवेदन

सकाळ वृत्तसेवा

कापडणे : पीकविमा योजना सुधारणा करावी, देशातील शेतकऱ्यांना चांगले बियाणे पुरवावे, बियाणे कायद्यात दुरुस्ती करावी. ब्रिडर सीडकरिता आकारली जाणारी फी व रॉयल्टी शेतकरीहितासाठी रद्द करावी, शेतकरी उत्पादक कंपन्यांचा प्रमाणित बियाणे वितरण अनुदानात समावेश करावा, शेतकऱ्यांना शेतीविषयक कर्जाचा व्याजदर कमी करावा, पीककर्ज सर्व शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे.

शेतकरी उत्पादक कंपन्यांनाही कर्ज उपलब्ध करून द्यावे, विद्राव्य खतांना अनुदान द्यावे आदी मागण्यांचे निवेदन केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांना राज्यातील शेतकऱ्यांनी दिले. (Reduce interest rate of agricultural loans Farmers statement to Union Minister of State for Agriculture Dhule News)

राज्यातील बीज उत्पादक शेतकरी कंपन्यांचे प्रतिनिधींनी निवेदन देण्यासाठी थेट दिल्ली गाठली. कृषी राज्यमंत्री चौधरी यांच्याशी सविस्तर चर्चाही केली.

निवेदनात म्हटले आहे, की पीक कापणी प्रयोगात मानवीय दोष, नुकसानभरपाई मंडळ पातळीवर न देता गावपातळीवर देणे, राज्यस्तरीय पीकविमा संनियंत्रण समिती व केंद्रीय संनियंत्रण समितीवर शेतकरी प्रतिनिधी नेमावा.

बीजोत्पादक शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या संघाचे प्रदेशाध्यक्ष तथा कृषिभूषण ॲड. प्रकाश पाटील, डॉ. अमोल रणदिवे (उस्मानाबाद), विठ्ठल पिसाळ (अहमदनगर), अनंता पाटील (हिंगोली), विजय म्हस्के (जालना) व दयानंद जाधव (लातुर) यांनी निवेदन दिले.

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

शेतकरी अनुदानासाठी स्वतंत्र पोर्टल

विमा नुकसानभरपाई विमा कंपनी स्वत: न वाटता शासनाकडे एकूण नुकसानभरपाई जमा करेल. सरकार पीएमएफई पद्धतीनुसार वाटप केला जाईल व नुकसानभरपाई आधार लिंक बँक खात्यात जमा केला जाईल. चुकीचे बँक खाते, बदल झालेले बँक खाते असेल तरी शेतकऱ्यांना योग्य खात्यात नुकसानभरपाई दिली जाईल.

पात्र शेतकऱ्यांना तांत्रिक कारणामुळे जर नुकसानभरपाई मिळाली नाही, तर कितीही केले तरी नंतर विमा कंपन्या टाळाटाळ करायच्या. आता तो निधी शासनाकडे असल्यामुळे असा प्रकार होणार नाही. यासाठी स्वतंत्र पोर्टल विकसित होणार असल्याची माहिती कृषी सहसचिव पंकज यादव व पीकविम्याचे आयुक्त सुनील कुमार यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut PC : रामदास कदमांचा धक्कादायक दावा, ठाकरे गटाने दिलं प्रत्युत्तर; नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

Mumbai News: मुंबईतील तरुण समुद्रात अडकला... एका घड्याळामुळे कसा वाचला जीव? थरारक प्रसंग वाचा...

IND vs WI 1st Test Live: अरे आताच फिफ्टी झाली होती, कशाला घाई केली! Shubman Gill चा चुकीचा फटका अन् विंडीजला मिळाली विकेट

RBI Monetary Policy: रिझर्व्ह बँकेने घेतला मोठा निर्णय; शेअर्स तारण ठेवून 1 कोटी रुपयांचे कर्ज घेता येणार

Deepak Borhade: दीपक बोऱ्हाडेंचे उपोषण तूर्त स्थगित; धनगर आरक्षणाचा लढा, शासनासोबत चर्चा सुरू ठेवण्याचा निर्धार

SCROLL FOR NEXT