reel maker Punished for making reels in front of girls dhule crime news  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News: तरूणाला मुलींसमोर रिल बनविणे पडले महागात! बसस्थानकात पोलिसांनी घडवली अद्दल

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News: येथील देवपूर बसस्थानकात सोमवारी (ता. २७) दुपारी सात ते आठ विद्यार्थिनी एसटीची वाट पाहात असतात. त्यावेळी त्यांच्यासमोर एक तरूण येतो, गाणे म्हणू लागतो, त्याचा मित्र शुटींग करीत असतो. (reel maker Punished for making reels in front of girls dhule crime news )

यानंतर ती क्लिप व्हॉटस्‌ॲपवर व्हायरल होते आणि मुलींची अशी छेड काढण्याचा प्रकार समजताच भाजपसह शिवसेनेचा शिंदे गट व इतर पक्ष, संघटना संतप्त होत पोलिस अधीक्षकांकडे टारगट तरूणांवर कारवाईची मागणी करतात. त्यानुसार हिरोगिरी करणाऱ्यावर देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला जातो.

`रिल` बनविताना सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढावे यासाठी देवपूर बसस्थानकाची निवड केली. त्यावेळी उपस्थित विद्यार्थिनींचा छेड काढण्याचा कुठलाही उद्देश नव्हता, असा युक्तीवाद करण्याचा प्रयत्न राज हिम्मत पवार (वय १९, रा. म्हसरूळ, नाशिक, ह. मु. विटाई, ता. शिंदखेडा) याने केला. तो शहरात बारावीचे शिक्षण घेत आहे.

सोशल मीडियावर चमकण्यासाठी त्याने हा उद्योग केला मात्र तो त्याच्या अंगलट आला. त्याला एलसीबीच्या पथकाने हुडकून काढत ताब्यात घेतले आणि दुपारी दीडच्या सुमारास देवपूर बसस्थानकात नेण्यात आले.

त्याने मुलींसमोर कान धरून उठबशा काढल्या, माफी मागितली, तसेच यापुढे असे कृत्य करणार नसल्याची ग्वाही दिली. यावेळी पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे उपस्थित होते. `अरे पैसा फेक, नाचेंगी पिंकी...फुल टू लेट`, असे रिलसाठी निवडलेले गाणे हिरोगिरी करणाऱ्या पवार याला अडचणीत आणणारे ठरले.

या प्रकरणी शहर- जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, शहर विधानसभाप्रमुख गजेंद्र अंपळकर, भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा मायदेवी परदेशी, महादेव परदेशी, नगरसेवक हिरामण गवळी, युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. रोहित चंदोडे, दिनेश बागुल, मोहिनी गौड, मयूर सूर्यवंशी, जयेश वावदे, राहुल परदेशी, शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज मोरे, संजय वाल्हे, निलेश काटे आदींनी कारवाईची मागणी केली. एलसीबीचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, देवपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतिष घोटेकर, पोलिस कर्मचारी मच्छिंद्र पाटील, मुकेश वाघ, शशिकांत देवरे, जितेंद्र वाघ, देवपूरचे मिलिंद सोनवणे, पंकज चव्हाण आदींनी कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv News: अतिवृष्टीमुळे नुकसान होऊन व कर्जबाजारीपणामुळे भूम तालुक्यातील शेतकऱ्याने संपवले जीवन

Ladki Bahin yojana: बहिणींसाठी ‘ई-केवायसी’ रुसली; ‘कनेक्टिव्हिटी’सह संकेतस्थळ वारंवार बंद होत असल्याने मनस्ताप

ठाण्यात सरकारी जागेवर ३ इमारती बांधल्या, बिल्डरकडून ११२ फ्लॅटधारकांची कोट्यवधींची फसवणूक

अरे वाह! 'या' मराठी अभिनेत्रीचा झाला साखरपुडा, नवरा सुद्धा आहे 'या' मालिकेतील अभिनेता, सोशल मीडियावर फोटोची चर्चा

Latest Marathi News Live Update : दादर प्लाझाजवळ भीषण अपघात, एकाचा मृत्यू,चार जखमी

SCROLL FOR NEXT