fraud esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Fraud Crime : साखरपुड्यानंतर मुलीशी लग्न करण्यास नकार; 'वरा'वर फसवणुकीचा गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Fraud Crime : पिंप्रिपाडा (ता. नंदुरबार ) येथील मुलीशी लग्न जमवून साखरपुडाही उरकला, मात्र महिना होत नाही तोच नियोजित वरासह त्याचा कुटुंबीयांकडून लग्न करण्यास नकार दिल्याने खांदेपाडा (नवागाव) येथील तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Refusal to marry girl after engagement case of fraud against groom nandurbar fraud news)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंप्रिपाडा (ता. नंदुरबार) येथील एका मुलीशी खांदेपाडा (नवागाव, ता. नंदुरबार) येथील गणेश वखू गावित या युवकाचे लग्नाबाबत बोलणी झाली. त्याच्या कुटुंबीयांकडून मुलगी पाहण्याचा कार्यक्रमासह रिवाजाप्रमाणे सोपस्कार पार पडले.

तसेच, १८ मे २०२३ ला मुलीशी गणेश गावित या तरुणाचा साखरपुडा पार पडला. त्यासाठी मुलीच्या वडिलांनी नातेवाइकांचा उपस्थितीत हा कार्यक्रम केला. त्यानंतर लग्नाची तारीखही निश्‍चित झाली. सहा जून २०२३ ला हळदीचा कार्यक्रम व दुसऱ्या दिवशी लग्न निश्‍चित केले. एका महिनाभरात वधू पित्याने लग्नाची तयारी केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मात्र हळदीच्या काही तासांपूर्वीच मुलगी पसंत नसल्याचे कारण दाखवून ऐनवेळेस मुलीशी लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे वधू पित्यासह कुटुंबीयांची फजिती झाली. लग्नासाठीचा खर्च करून तयारी झाल्यावर ऐनवेळेस नकार दिल्याने वधू पित्याची व वधूची फसवणूक केली.

त्यामुळे नियोजित वधूने स्वतः नंदुरबार तालुका पोलिस ठाणे गाठत घडलेली घटना पोलिसांना सांगितली. त्यावरून खांदेपाडा येथील नियोजित वर असलेला गणेश वखू गावित, त्याचे वडील वखू नाथल्या गावित व आई मागीबाई वखू गावित या तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT