Unrepaired paving work in progress. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : पंधरा वर्षांपासून बंद पाटचारीची दुरुस्ती; शेतकऱ्यांना दिलासा

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : बोरकुंड (ता. धुळे) येथील इंदूबाई भदाणे प्रतिष्ठानतर्फे कुंडाणे शिवार ते वारपर्यंतच्या चार किलोमीटर क्षेत्रात पाटचारी, खोलीकरण आणि रुंदीकरणाचे काम झाले. त्यामुळे तब्बल पंधरा वर्षांपासून बंद वार येथील पाटचारी दुरुस्त झाली.

परिणामी, परिसरातील सिंचनाचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. प्रतिष्ठानच्या कार्याबद्दल वार परिसरातील शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. (Repair of Pachari closed for fifteen years Relief to farmers Jalgaon News)

भदाणे प्रतिष्ठानने धुळे तालुक्यातील अनेक गावांत आतापर्यंत जेसीबी, पोकलॅंड उपलब्ध करून देत शेकडो एकर क्षेत्रातील सिंचनाचा प्रश्न सोडविण्यात योगदान दिले आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब रावण भदाणे, सचिव जिल्हा परिषद सदस्या शालिनी भदाणे या दांपत्याने ही किमया घडविली आहे.

शेतकऱ्यांची व्यथा

भदाणे प्रतिष्ठानतर्फे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यात बोरी पट्ट्यासह तालुक्यातील नाले व पाटचारीच्या रुंदीकरणासह खोलीकरणासाठी मदतीचा हात दिला जात आहे. आनंदखेडे शिवार ते वार (कुंडाणे) या गावापर्यंत ब्रिटिशकालीन पाटचारी जाते.

ती पंधरा वर्षांपासून नादुरुस्त असल्याने शेतकऱ्यांना लाभ होत नव्हता. या दुरुस्तीसाठी शेतकरी सतत पाठपुरावा करीत होते. याप्रश्‍नी त्यांनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष भदाणे यांच्याकडे व्यथा मांडली.‌ ही समस्या निवारणार्थ प्रतिष्ठानने पुढाकार घेतला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पाणीप्रश्‍न मार्गी लागला

पाटचारीचे खोलीकरण, रुंदीकरणासाठी प्रतिष्ठानने पोकलॅंड दिले. त्यामुळे सरासरी चार किलोमीटरची पाटचारी दुरुस्त झाल्याने पाणीप्रश्‍न मार्गी लागू शकला. पाटचारीतील पाणी वार परिसरातील आपटी नाल्यात टाकले जाते.

त्यामुळे नाल्यावरील केटी वेअर भरण्यास मदत होणार आहे. याकामी वार सोसायटीचे संचालक युवराज मराठे, दिलीप पाटील, उपसरपंच हिरामण अहिरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धनराज गायकवाड, सदस्य अनिल ठाकरे, आना नाईक, नवल भिल, अमोल पारधी, अशोक पाटील, रवींद्र वाघ, मनोहर ठाकरे, सुरेश ठाकरे, प्रवीण मराठे, किरण मराठे, ग्रामसेवक बिरारी आदींनी पाठपुरावा केला.

मागेल त्याला मशिनरी : भदाणे

इंदूबाई भदाणे प्रतिष्ठानतर्फे धुळे तालुक्यात नाले, पाट खोलीकरणाची अनेक कामे मार्गी लागली असून यापुढेही मागेल त्याला मशिनरी (जेसीबी, पोकलॅंड) पुरविली जाईल. तालुक्यातील शेतकऱ्यांना संपर्कासह लाभाचे आवाहन भदाणे दांपत्याने केले.

वार, विंचूर, सिताणे, चांदे, नंदाळे, धाडरा-धाडरी- कुळथे, बोरकुंड, दोंदवाड, जुनवणे, बोरविहीर आदी ठिकाणी प्रतिष्ठानने सिंचनाची कामे केली.

मुख्य कालवा, पाटचारी, पोटचारी आदींची साफसफाई, रुंदीकरण व खोलीकरण करणे, तसेच शेतकऱ्यांच्या मागणीनुसार नवीन कामे पूर्ण केली आहेत. काही नाले, पाटचाऱ्या दहा ते पंधरा वर्षांपासून बंद होत्या.अशी कामे मार्गी लागल्याने शेकडो एकरवरील सिंचनाचा प्रश्न सुटला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT