contaminated water issue
contaminated water issue esakal
उत्तर महाराष्ट्र

Contaminated Water : ...अन्यथा अधिकाऱ्यांनाच दूषित पाणी पाजू; जुने धुळ्यातील रहिवाशांचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

धुळे : वारंवार तक्रार करूनही दूषित (Contaminated) पाणीपुरवठ्याची समस्या सुटत नसल्याचे म्हणत जुने धुळे भागातील सुपडूआप्पा कॉलनीतील रहिवाशांनी मंगळवारी (ता. ७) महापालिका गाठत अधिकाऱ्यांच्या टेबलावरच दूषित पाण्याचे नमुने ठेवले. (residents warned that if problem of contaminated water not resolved within 7 days they give same water to authorities dhule news)

सात दिवसांत ही समस्या सुटली नाही तर हेच दूषित पाणी अधिकाऱ्यांना पाजू, असा इशारा या रहिवाशांनी दिला. दरम्यान, संबंधित भागात नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

शहरातील प्रभाग क्रमांक १० मधील सुपडूअप्पा कॉलनीसह परिसरात पाच महिन्यांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. याबाबत नगरसेवकांसह महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या, मात्र त्याची दखल घेतली नसल्याचे तेथील रहिवाशांचे म्हणणे आहे.

याप्रश्‍नी अखेर मंगळवारी अ‍ॅड. सचिन जाधव, आकाश परदेशी यांच्या नेतृत्वाखाली संतप्त महिला-पुरुषांनी मंगळवारी महापालिकेवर मोर्चा आणला. महापालिकेत उपायुक्त विजय सनेर यांच्याकडे त्यांनी दूषित पाण्याची समस्या मांडली. कनिष्ठ अभियंता प्रदीप चव्हाण उपस्थित होते.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

गेल्या पाच महिन्यांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. परिसरात गटाराचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले. त्यामुळे ही समस्या निर्माण झाल्याचे ॲड. जाधव म्हणाले. दरम्यान, येत्या सात दिवसांत ही समस्या सुटली नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू, दूषित पाणी अधिकाऱ्यांना पाजण्यात येईल, असा इशारा दिला.

अंकिता जाधव, उषा बडगुजर, शकुंतला बडगुजर, बेबाबाई बडगुजर, सुनंदा माळी, पुष्पा मिस्त्री, अनिता परदेशी, चंद्रकांत माळी, भिकूबाई माळी, प्रतिभा चंदाले, वैशाली बडगुजर, अनिता माळी, मनीषा शिंदे आदी महिलांचा मोर्चात सहभाग होता.

नवीन जलवाहिनीचे काम

दूषित पाणीपुरवठ्याच्या समस्येबाबत यापूर्वी जलवाहिनी वॉशआउट करण्यात आली, काही गळत्याही काढल्या. मात्र, तरीही तेथे समस्या आहे. जुनी जलवाहिनी गटाराखाली आहे. अरुंद परिसर असल्याने गळती शोधताना अडचणी येतात.

त्यामुळे संबंधित भागात २००-२५० फूट लांबीची सहा इंची नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेतले आहे, अशी माहिती कनिष्ठ अभियंता चव्हाण यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: 48 तासांत मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यावर सुनावणी, कोर्टाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावून उत्तर मागितले

Gurucharan Singh: बेपत्ता झालेला गुरुचरण सिंग अखेर घरी परतला; म्हणाला, "मी धार्मिक प्रवासाला निघालो होतो..."

Stock Market: 20 मे रोजी मुंबईतील लोकसभा मतदानामुळे शेअर बाजार बंद राहणार का?

IPL 2024 MI vs LSG : मुंबई संघाच्या गोलंदाजीची दुर्दशा कायम;निकोलस पूरनच्या झंझावाती फलंदाजीमुळे लखनौच्या २१४ धावा

Latest Marathi News Live Update : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला बसची धडक 25 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT