Nandurbar: While guiding the Mohalla Committee meeting, District Superintendent of Police P. R. Patil. Neighbor Additional Superintendent of Police Nilesh Tambe, Sub Divisional Police Officer Sanjay Mahajan, City Police Inspector Ravindra Kalamkar, Pappu Qureshi and members of the Mohalla Committee were present. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : आषाढी एकादशी - बकरी ईद एकाच दिवशी; ईदच्या दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : बकरी ईद व आषाढी एकादशी एकाच दिवशी २९ जूनला साजरी होत आहे. उत्सवाच्या अनुषंगाने रविवारी (ता. २५) शहरातील कुरेशी मोहल्ला येथे जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मोहल्ला कमिटीची बैठक झाली.

बैठकीत आषाढी एकादशीच्या दिवशी बकरी ईद साजरी होत असली, तरी त्या दिवशी बकरीची कुर्बानी न देण्याचा व दोन धर्मीयांमध्ये बंधुत्व व सामाजिक एकोपा वाढविणारा निर्णय येथील मुस्लिम बांधवांनी घेतला आहे.(Resolution in Mohalla Committee meeting Ashadhi Ekadashi Bakra Eid on same day Decision not to perform Qurbani on day of Eid Nandurbar News)

त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत व कौतुक केले जात आहे.बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील म्हणाले, की नंदुरबार जिल्ह्यातील नागरिक शांतताप्रिय असून, सर्वसामान्य नागरिकांना शांतता हवी आहे.

गेल्या काही दिवसांत नंदुरबार जिल्ह्यात शांतता टिकवून ठेवण्यात सर्व सामाजिक घटकांनी हातभार लावला आहे, तसेच आपली जबाबदारी ओळखून नागरिक पोलिसांना सहकार्य करीत आहेत. त्यामुळे नागरिकांनी कायद्याच्या चौकटीत राहून सण साजरा करावा.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

काही तक्रारी, अडचणी असतील तर आपल्या हद्दीतील पोलिस अधिकारी किंवा पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा. एकमेकांच्या भावनांचा आदर करीत सण व उत्सव साजरे केल्यास सामाजिक एकोपा टिकून राहील, असेही या वेळी श्री. पाटील यांनी सांगितले.

मोहल्ला कमिटीच्या बैठकीत कुरेशी समाजातर्फे पप्पू कुरैशी, हाजी युनूस, अबिद पहेलवान, जाकिर कुरैशी यांनी पुढाकार घेऊन आषाढी एकादशीच्या दिवशी कुर्बानी करणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच पोलिसांच्या आवाहनाला मुस्लिम समाजाचा पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीदरम्यान अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उपविभागीय अधिकारी संजय महाजन, नंदुरबार शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी आगामी सण/उत्सव व सामाजिक सलोखा राखण्याबाबत मनोगत व्यक्त केले. कुरेशी मोहल्ल्यामध्ये झालेल्या बैठकीत मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधव उपस्थित होते.

बैठकीस नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर, जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक भरत जाधव, नंदुरबार शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह शांतता समितीचे सदस्य राजू इमानदार, डॉ. जमील शेख, मौलाना अब्दुल हाफिज, निंबा माळी, माणिक माळी, मालती वळवी, तौसिफ शेख आदी उपस्थित होते.

"नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते, की २९ जूनला बकरी ईदआषाढी एकादशी हे सण उत्साहाने साजरे करताना कायद्याचे पालन होईल याची दक्षता घ्यावी. कायदा व सुव्यवस्था राखण्याकामी सर्व घटकांनी आगामी सण/उत्सवाच्या काळात सक्रियपणे मदत करावी व सामाजिक सलोखा राखावा."

-पी. आर. पाटील, पोलिस अधीक्षक, नंदुरबार

तळोद्यातही कुर्बानी न देण्याचा निर्णय

तळोदा येथील मुस्लिम समाजाने जामा मशीद, गौशिया सिद्दिकिया मशीद पंच (ट्रस्ट) व समाजाच्या प्रतिष्ठित नागरिकांची संयुक्त बैठक घेऊन ज्या दिवशी आषाढी एकादशी आहे, त्या दिवशी कुर्बानी न करण्याच्या निर्णय घेण्यात आला. हा निर्णय एकमुखी घेण्यात आला असून, त्यास सर्वांनी संमती दर्शविली आहे.

या वेळी तळोदा पोलिस निरीक्षक अजयकुमार पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमितकुमार बागूल, पोलिस नाईक अजय पवार, पोलिस नाईक अनिल पाडवी, मुस्लिम समाजाचे अध्यक्ष आरिफ शेख नुरा, प्रगतिशील शेतकरी हाजी निसार मकराणी, याकूब पिंजारी, माजी नगरसेवक अमानुद्दीन शेख, अकील अन्सारी, माझी नगरसेवक कलीम अन्सारी, सुलतान अब्दुल गणी, बबलू पिंजारी, पप्पू सय्यद, समीर पिंजारी, सादिक कुरेशी, गफ्फार कुरेशी, रऊफ अन्सारी, मुखतार कुरेशी, पिंजारी समाज अध्यक्ष शकील मन्सुरी, साबीर मिस्तरी, असलम हैदर पिंजारी, नासिर मणियार, नासिर खाटीक, हनीफ मणियार, साबीर पिंजारी, मुस्ताक अली कालूमिया, रफीक शेख, सादिक सय्यद, रसूल मिस्तरी आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात निसार मकराणी, आरिफ शेख नुरा, याकूब पिंजारी यांनीदेखील मनोगत व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

History! फुटबॉल खेळणाऱ्या देशाचे क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये पदार्पण; इटलीचा संघ T20 World Cup 2026 स्पर्धेसाठी पात्र ठरला

IND vs ENG 3rd Test: शुभमन गिलने मोडला 'विराट' विक्रम! लोकेश राहुलच्या फिफ्टीने लढवला किल्ला, रिषभ पंत दुखापतीतून सावरला

IND vs ENG 3rd Test: OUT or NOT OUT? जो रूटने अफलातून झेल, नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; राहुल द्रविडचा विक्रम मोडला, पण रंगलाय वाद

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

Shambhuraj Desai : संजय राऊतांच्या वक्तव्याची पर्यटनमंत्री शंभुराज देसाईंनी उडवली खिल्ली

SCROLL FOR NEXT