bhat and panjhara river
bhat and panjhara river esakal
उत्तर महाराष्ट्र

River Amrut Yatra : भातसह पांझरेची ‘जैसे थे’ अवस्था..! पुनरुज्जीवनास गती मिळणार

जगन्नाथ पाटील

Dhule News : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शासन आणि स्वयंसेवी संस्थांतर्फे राज्यात ‘नदी अमृत यात्रा’ महोत्सव साजरा होत आहे. याद्वारे राज्यभरातील १०८ नद्यांना अमृतवाहिनी बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे. (River Amrut Yatra bhat and panjhara river revival work not started dhule news)

यात खानदेशातील १३ आणि जिल्ह्यातील पांझरा व भात नदीचा समावेश झाला आहे. या नद्यांचा अभ्यास करून पुनरुज्जीवन करण्यास गती मिळणार आहे. गेल्या आठ महिन्यांपासून हा कार्यक्रम रखडला असल्याचे पुढे आले आहे. लोकसहभागातून पुनरुज्जीवनाचा डोलारा अवलंबून असल्याचे म्हटले जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

अमृत यात्रेच्या पहिल्या टप्प्यात पांझरा व भात नदीची सध्याची प्रदूषण स्थिती, वाळूउपसा, अतिक्रमणे, सोडले जाणारे सांडपाणी, पूल व अन्य बांधकामे याच्या नोंदी घेतल्या गेल्यात. नदीचे मूळ जलस्रोत व उपक्रम यांचे आराखडे तयार झाले. नदीच्या खोऱ्यातील सर्व गावांत शासनस्तरावर माथा ते पायथा आराखडा तयार केला जात आहे.

या ठिकाणी जलसंधारणाची कामे केली जाणार आहेत. स्थानिक ग्रामस्थांना सहभागासाठी उद्युक्त केले जाईल. आजवर पुनरुज्जीवित केलेल्या नद्यांना मॉडेल स्वरूपात समोर ठेवून काम होणार आहे. राज्यभरात ‘चला, जाणूया नदीला’ हे अभियान सुरू होऊनही ठोस पावले अद्याप उचली गेलेली नाहीत. हे अभियान फुसका बार तर नाही, अशी चर्चा जाणकारांमध्ये सुरू आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नदीचा श्वास अन् स्वास्थ्य

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त राज्यात नदीचा श्वास आणि स्वास्थ्य नेटके राहावे, या दृष्टीने राज्यात नदी संवाद यात्रा सुरू झाली आहे. नदी विषयांचे महत्त्व मोल याची जनजागृती करण्यासाठी ही यात्रा सुरू झाली. नगर जिल्ह्यात १५ ऑक्टोबरपासून नदी संवाद यात्रेचा आरंभ झाला.

जलपुरुष राजेंद्र सिंह यांच्या जलबिरादरी आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने नदी संवाद यात्रेचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. मानवी भविष्यावरचे प्रश्नचिन्ह ही बाब लक्षात घेऊन राज्यात नदीचा श्वास आणि स्वास्थ्य नेटके राहावे, या दृष्टीने राज्यात नदी संवाद यात्रा सुरू झाली. नदी विषयाचे महत्त्व मोल याची जनजागृती करण्यासाठी ही यात्रा सुरू झाली आहे.

उन्हाळा संपत आलाय, आता..!

नदी पुनरुज्जीवनाची मोहीम पावसाळ्यानंतर गती घेईल, असे सांगितले जात होते. प्रत्यक्षात आठ महिने उलटले. उन्हाळाही अवघा तीन आठवड्यांवर राहिलाय. आता पुनरुज्जीवनाचे काम सुरू होणे अशक्यच आहे. पुन्हा हे काम दिवाळीनंतरच सुरू होण्याच्या अपेक्षांवर आले आहे.

नदी पुनरुज्जीवनाचा आराखडा

पांझरा नदीचे पुनरुज्जीवन झाल्यास जिल्ह्यासाठी मोठे वरदान ठरणार आहे. जिल्ह्यात हरितक्रांतीसह धवलक्रांतीही होईल. पण सरकारी काम आणि सहा महिने थांब, असे म्हटले जाते. त्याची प्रचीती साऱ्यांनाच येते. तूर्त नदी पुनरुज्जीवनाचा आराखडा तरी घोषित करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT