While spreading Murum in the pit in front of Patilwadi on Old Khetiya Road in the city.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Sakal Impact : शहाद्यातील रस्त्याची अखेर दुरुस्ती; मुख्य रस्त्याच्या वृत्ताची दखल

सकाळ वृत्तसेवा

Sakal Impact : शहरातील जुना खेतिया रस्त्यावरील पाटीलवाडीसमोर मुख्य रस्त्याची पहिल्याच पावसात पूर्णतः वाट लागली असून, रस्त्यावर मोठे डबके साचत होते.

त्यातूनच वाहनधारकांना मार्गक्रमण करीत होते. (sakal impact road in Shahada is finally repaired nandurbar news)

अपघाताची शक्यता पाहता याबाबत ‘सकाळ’ने मंगळवारी (ता. ४) ‘रस्ता बनला स्वीमिंग पुल’ या मथळ्याखाली सचित्र बातमी प्रसिद्ध करून संबंधित विभागाचे लक्ष वेधले होते. त्याची दाखल घेत बुधवारी (ता. ५) संबंधित रस्त्यावर जेसीबीद्वारे मुरूम पसरविण्यात आला.

शहादा शहरातून जाणारा जुना खेतिया रस्ता मलोनी, उंटावद, सातपुडा साखर कारखाना, सूतगिरणी, लोणखेडा व इतर तत्सम खेड्यांना जोडला असल्याने कायम वर्दळ असते. या रस्त्यावर शाळा, बहुतांश रुग्णालये, विविध गॅरेज असल्याने वाहन दुरुस्तीसाठी नागरिक आपली वाहने घेऊन याच रस्त्यावर दुरुस्तीसाठी जातात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याची अवस्था पाहता पाऊस पडल्यानंतर ठिकठिकाणी पाणी साचून या रस्त्याला स्वीमिंग पुलाचे स्वरूप येते. गेल्या सहा-सात महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रस्त्याचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते; परंतु पाटीलवाडीसमोरील रस्ता दुरुस्ती करण्यास संबंधित विभागाला विसर पडला की काय, असा प्रश्न स्थानिक नागरिक करीत होते.

प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी नागरिक व वाहनधारकांतर्फे करण्यात आली होती. अपघाताची शक्यता पाहता ‘सकाळ’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर संबंधित विभागाने त्या खड्ड्यात मुरूम टाकून जेसीबी यंत्राद्वारे पसरविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Voter Fraud: बापरे! एकाच घरात ४ हजार २७१ मतदार; अधिकाऱ्यांनी केले हात वर, म्हणाले...

Latest Maharashtra News Updates : मुंबईकरांचे म्हाडाच्या लॉटरीतील घराचे स्वप्न लांबणीवर!

Gold Investment : 'पितृपक्षात सोने खरेदी करू नये' हा गैरसमज मोडीत; सराफ व्यावसायिकांचे निरीक्षण

US tariff on India update: अमेरिका लवकरच मोठा निर्णय घेणार! भारतावरील अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ हटवणार?

Neeraj Chopra कडून घोर निराशा! जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक राखण्यात अपयशी, टॉप-६ मध्येही स्थान नाही

SCROLL FOR NEXT