Residential photo
Residential photo 
उत्तर महाराष्ट्र

मारहाणीतील तिघा आरोपींना ÷न्यायालयाने दिली "एक' संधी 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : परराज्यातून आलेल्या गहू कापणीचे हार्वेस्टर मशिनवरील दोघांना मारहाण करून डांबून ठेवण्यात आल्याच्या गुन्ह्यातील तिघा आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने सुधारण्याची एक संधी दिली आहे. त्यानुसार, त्यांना तीन वर्षांसाठी प्रत्येकी 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्‍यावर सुटका केली आहे. असे असले तरी, याकाळात त्यांच्यावर अन्य कोणताही गुन्हा दाखल झाल्यास न्यायालयाकडून त्यांना यागुन्ह्यात शिक्षा ठोठावली जाऊ शकते. 

संदीप मन्साराम सोनवणे, विकी उर्फ गौरव अंकुश देवरे, भावड्या शिवाजी बहुरे (सर्व रा. निकवेल, ता. सटाणा) असे तिघांही आरोपींची नावे आहेत. कळवणी-वणी रोडवरील साकोरे गावाच्या शिवारात 13 मार्च 2015 रोजी रात्री सदरची घटना घडली होती. धमसिंग नथुसिंग हिरणवाल (रा. पट्टा, ता. आसंद, जि. कर्नाल, हरियाणा) यांच्या फिर्यादीनुसार, ते कळवण तालुक्‍यात गहू कापणीचे हार्वेस्टर मशिन घेऊन आले होते. 13 मार्च 2015च्या रात्री 10 वाजेच्या सुमारास तिघांनी श्री. हिरणवाल व त्यांचे साथीदार या दोघांना साकोरे शिवारात अडविले. त्यांना हार्वेस्टर मशिन परत घेऊन जाण्याची तंबी देत जिपमध्ये बळजबरीने बसवून निकवेल (ता. सटाणा) येथे नेले. त्याठिकाणी दोघांना बेदम मारहाण केली. तसेच, त्यांच्याकडील 1 लाखांची रोकडही काढून घेतली होती. याप्रकरणी कळवण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
सदरील खटल्याचे कामकाज जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायधीश एस.टी. पांडे यांच्यासमोर खटला चालला. सरकारी पक्षातर्फे ऍड. संजय पाटील, ऍड. योगेश कापसे यांनी कामकाज पाहताना पंच, साक्षीदार तपासले. यावेळी न्या. पांडे यांनी तीनही आरोपींचे वय, त्याआधी त्यांच्याविरोधात कोणताही गुन्हा नोंद नव्हता, तसेच त्यांनी केलेला गुन्हा पाहता तिघांनाही सुधारण्याची एक संधी देण्याचा निकाल दिला. त्यासाठी तिघांची प्रत्येकी 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्‍यावर (बॉण्ड) सुटका केली. परंतु, या काळात त्यांनी कोणताही गुन्हा केल्यास, या खटल्यातही त्यांना शिक्षा सुनावली जाऊ शकते असेही सांगितले. पैरवी अधिकारी म्हणून हवालदार सांगळे, मंगेश वझरे यांनी पाठपुरावा केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT