Sambhaji-Brigade
Sambhaji-Brigade 
उत्तर महाराष्ट्र

संभाजी ब्रिगेड लढविणार लोकसभा - मनोहर पाटील

सकाळवृत्तसेवा

धुळे - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत संभाजी ब्रिगेड ताकदीनिशी उतरणार असून, योग्य वेळी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येतील, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मनोहर पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

यावेळी विभागीय कार्याध्यक्ष हेमंत भडक, महानगराध्यक्ष श्‍याम निरगुडे, राजेंद्र पवार, जितेंद्र मराठे, पंकज पाटील उपस्थित होते. 

श्री. पाटील यांनी सांगितले, की लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी संभाजी ब्रिगेडकडे इच्छुक उमेदवार तयार आहेत. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव आणि दारूमुक्‍त गाव या दोन मुद्यांवर आम्ही निवडणूक लढविणार आहोत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीबरोबरच पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांचीही तयारी करत आहोत. ‘गाव तेथे संभाजी ब्रिगेड’ आणि ‘घर तेथे कार्यकर्ता’ अशी भूमिका घेऊन काम सुरू असल्याचेही श्री. पाटील यांनी सांगितले.

‘ईव्हीएम’बाबत याचिका देणार
महापालिका निवडणुकीत ईव्हीएम मशिनचा घोळ झाल्याच्या तक्रारी केल्या. या संदर्भात निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदार असलेल्या महापालिका आयुक्‍तांना निवेदनही दिले. याबाबत योग्य न्याय मिळाला नाही तर सर्वपक्षीय याचिका दाखल करणार असल्याचा इशाराही यावेळी संभाजी ब्रिगेडतर्फे देण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : आवेश खानने हैदराबादला दिला मोठा धक्का; हेड अर्धशतकानंतर बाद आता रेड्डीवर मदार

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT