Former Minister Rohidas Patil speaking in the meeting regarding the planning of Kisan Samvad Yatra of Congress. Neighbor former MLA D. S. Ahire, former MP Bapu Chaure and other officials. esakal
उत्तर महाराष्ट्र

Kisan Samvad Yatra : किसान काँग्रेसतर्फे संवाद यात्रा; धुळे जिल्ह्यात 4 व 5 डिसेंबरला आगमन

सकाळ वृत्तसेवा

Kisan Samvad Yatra : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटींतर्गत प्रदेश किसान काँग्रेसतर्फे धुळे जिल्ह्यात ४ व ५ डिसेंबरला शेतकरी संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर व नागरिकांनी या संवाद यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन धुळे जिल्हा किसान काँग्रेस व जिल्हा काँग्रेसतर्फे करण्यात आले आहे.(Samvad Yatra by Kishan Congress on 4 and 5 december dhule news)

राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. पीकविम्याची रक्कम अजूनही मिळाली नाही. तरीही शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे सरकार लक्ष द्यायला तयार नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे लक्ष वेधण्यासाठी प्रदेश किसान काँग्रेसतर्फे शेतकरी संवाद यात्रा काढण्यात येत आहे.

या यात्रेच्या नियोजनासाठी माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (ता. १) सकाळी दहाला आमदार कुणाल पाटील यांच्या देवपूर येथील संपर्क कार्यालयात काँग्रेस व किसान काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या वेळी शेतकरी संवाद यात्रेचा मार्ग व सभेचे ठिकाण निश्‍चित करण्यात आले.

४ डिसेंबरला नंदुरबार येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते संवाद यात्रेचे उद्‍घाटन होईल. त्यानंतर नंदुरबार येथून निघालेल्या संवाद यात्रेचे सोमवारी (ता. ४) सायंकाळी पाचला सिंदबंद (ता. साक्री) येथे आगमन होईल. त्यानंतर सायंकाळी साडेपाचला छडवेल कोर्डे येथे स्वागत व कार्नर सभा, टिटाणे फाटा, जैताणे येथे स्वागत, तर निजामपूर येथे सायंकाळी सातला सभा होईल. बळसाणे (ता. साक्री) येथे रात्री नऊला मुक्काम असेल.

५ डिसेंबरला धुळे तालुक्यात

किसान संवाद यात्रा मंगळवारी (ता. ५) बळसाणे येथून मार्गस्थ होऊन कढरे, लोणखेडी, लामकानी येथे पोचेल. दुपारी तीनला चिंचवार (ता. धुळे) येथे यात्रेचे स्वागत व विश्रांती. दुपारी चारला धुळे तालुक्यातील मेहेरगाव, निमडाळे, गोंदूर येथे स्वागत. सायंकाळी सातला वलवाडी-भोकर येथे शेतकरी संवाद यात्रेची समारोप सभा होईल.

संवाद यात्रेच्या नियोजन बैठकीला माजी मंत्री पाटील, माजी खासदार बापू चौरे, माजी आमदार डी. एस. अहिरे, किसान काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष उत्तम देसले, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, शहराध्यक्ष डॉ. अनिल भामरे, काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉ. दरबारसिंग गिरासे, साक्री तालुका काँग्रेस अध्यक्ष भानुदास गांगुर्डे, किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्याम भामरे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT