nangre patil on school students.jpg 
उत्तर महाराष्ट्र

विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी शाळेचीच... 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शालेय विद्यार्थ्यांची खासगी वाहनांतून होणारी कोंबाकोंबीची गंभीर दखल घेत, विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाची सर्वस्वी जबाबदारी शाळेची आहे. तसेच शाळांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेलाच प्राधान्यक्रम दिला पाहिजे, असे सांगत शालेय परिवहन समितीत पोलिसांचा समावेश करावा, अशी सूचना पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी दिली. 

पोलिस आयुक्तांच्या सूचना 

पोलिस आयुक्तालयाच्या भीष्मराज बाम सभागृहात आयुक्त विश्‍वास नांगरे- पाटील यांच्या उपस्थितीत शहर वाहतूक शाखा आणि शहरातील स्कूल बस, खासगी स्कूल बस, स्कूल व्हॅन प्रतिनिधींची बैठक झाली. या वेळी शहर वाहतूक शाखेच्या उपायुक्त पौर्णिमा चौघुले, सहाय्यक आयुक्त मंगलसिंह सूर्यवंशी उपस्थित होते. 

पोलिस- स्कूल बस प्रतिनिधींची बैठक 

या बैठकीत शासनाच्या शालेय शिक्षक व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनांची चर्चा करण्यात आली. त्यानुसार, शाळांमध्ये परिवहन समिती स्थापन करून त्यानुसार कामकाज करणे, या समितीत पोलिसांचा समावेश करण्याच्या सूचना आयुक्तांनी केली. तसेच शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळी दोन ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती शाळेने करणे अनिवार्य आहे. शाळेच्या आवारात पोलिसांचा क्‍यूआर कोड लावावा. शालेय बसची तपासणी करण्यात येऊन ओळखपत्र देण्यात यावे, शाळांमध्ये एक पोलिस काका आणि पोलिसदीदी ही संकल्पना राबवावी. बसचालकाकडे पोलिस नियंत्रण कक्ष, पोलिस ठाण्याचा क्रमांक असणे आवश्‍यक आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शाळांच्या वेळापत्रकात बदल करावा. पालकांना तक्रार करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बस, रिक्षा, व्हॅनवर तत्काळ कारवाई करावी, अशाही सूचना करण्यात आल्या.

..तर पोलिसांकडून कायदेशीर कारवाई

त्याचप्रमाणे नियमांचे पालन न करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कायदेशीर कारवाई पोलिसांकडून केली जाईल, असेही संकेत आयुक्तांनी दिले. स्कूल बस प्रतिनिधींनीही समस्या मांडल्या. सदानंद इनामदार यांनी सूत्रसंचालन केले. बैठकीला वाहतूक शाखेचे निरीक्षक फुलदास भोये, सदानंद इनामदार, अनिल पवार, कैलास पाटील, भारतकुमार सूर्यवंशी, नीलेश माईनकर यांच्यासह स्कूल बस, खासगी स्कूल बस, व्हॅनचालक असे 82 प्रतिनिधी उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Attack: होर्मुझमधील तेलवाहू जहाजांवरील हल्ल्यात 2 भारतीय खलाशी बेपत्ता

Kankavli Police Constable Death : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिला पोलिस हवालदाराचा जंगलात आढळला मृतदेह; झाडाला घेतलेला गळफास, तिचा नवरा आहे पोलिस दलात...

सहा वर्षांनी छोट्या पडद्यावर परतणार ही गाजलेली नायिका; 'वहिनीसाहेब' बनून प्रेक्षकांच्या मनावर केलेलं राज्य, कोण आहे ती?

Latest Marathi News Live Update : वकिलांशी कथित गैरवर्तन; सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून निषेध

Uttarakhand: चीन-नेपाळ सीमेवरील जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाची नवी संधी; पहिल्या वर्षी ५० एमबीबीएस जागा

SCROLL FOR NEXT