second wife beating husband and stole 13 lakh dhule crime news esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : दुसऱ्या पत्नीचा धिंगाणा! पतीला केली मारहाण अन ऐवजही चोरला...

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : शहरातील देवपूर भागात दुसऱ्या पत्नीने धिंगाणा घालत पतीला मारहाण केली, ठार करण्याची धमकी देऊन पतीला खोलीत कोंडले. (second wife beating husband and stole 13 lakh dhule crime news)

शिवाय पहिल्या पत्नीच्या मुलीच्या लग्नासाठीचे दागिने, साड्या, कपडे असा तब्बल साडेतेरा लाखांचा ऐवज अन्य तिघा साथीदारांच्या मदतीने लुटूनही नेला. या प्रकरणी सोमवारी (ता. ३) सायंकाळी देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

वन विभागात नोकरीला असलेले काशीनाथ धुडकू देवरे (वय ५२, रा. श्रीरंग कॉलनी, देवपूर धुळे) यांनी एम. ए. पाटील (रा. तिरुपती अपार्टमेंट, फ्लॅट क्रमांक दोन, जगन्नाथनगर, देवपूर) यांच्याशी दुसरा विवाह केला होता. सध्या एम. ए. पाटील काशीनाथ देवरे यांच्याकडे राहत नाहीत.

२९ एप्रिलला सायंकाळी पावणेसात ते सातच्या सुमारास त्या प्रवीण ऊर्फ साई इंधन पाटील (रा. धुळे) आणि एका वाहनात दोन जण असे चौघे काशीनाथ देवरे यांच्या घरी आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यांनी श्री. देवरे यांना मारहाण करून शिवीगाळ केली.

ठार करण्याची धमकी दिली. श्री. देवरे यांना बेडरूममध्ये बंद केले. त्यानंतर श्री. देवरे यांच्या घरातील पहिल्या पत्नीचे सोने, मुलीच्या लग्नासाठी घेतलेले सोन्या-चांदीचे दागिने, साड्या, ड्रेसेस असा एकूण १३ लाख ३५ हजारांचा ऐवज चोरून नेला.

घडलेल्या घटनेमुळे काशीनाथ देवरे अस्वस्थ झाले होते. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी मुलाशी चर्चा केल्यानंतर त्यांनी देवपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी चौघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vadodara-Mumbai: वडोदरा–मुंबई द्रुतगती महामार्गाला बंदराशी थेट जोड! १४ किमीचा नवीन रस्ता बांधणार; पण कुठे? पाहा मार्ग

मोठा निर्णय! वाहनांमध्ये GPS सक्तीचे; मार्ग बदलला तर कारवाई होणार, राज्य सरकारचा मोठी घोषणा

Madhuri Elephant Latest Update : अखेर शिक्कामोर्तब! नांदणी मठाची माधुरी हत्तीण परत येणार; हाय पावर कमिटीकडून वनताराचे संवर्धन केंद्र बांधण्यास परवानगी

कधी सुरू झाला कधी संपला समजलंच नाही! झी मराठीच्या 'या' मालिकेने अचानक घेतला निरोप; प्रेक्षकही चकीत

Chh. Sambhaji Nagar News : कन्नड तालुक्यात ६६१ शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण; शासकीय मका खरेदीचा मुहूर्त मात्र रखडलेला!

SCROLL FOR NEXT