Teacher News  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : चलन, याद्यांसाठी मंडळ प्रतिनिधी पाठवा : शिक्षक संघटना

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : जुलै-ऑगस्ट २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा शुल्काचे चलन व विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करण्यासाठी धुळे केंद्रावर मंडळ प्रतिनिधी पाठविण्यात यावेत, अशी मागणी धुळे जिल्हा शिक्षकभारती, स्वाभिमानी शिक्षक संघटना, शिक्षकेतर संघटनांनी केली आहे.

जुलै-ऑगस्ट २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र पुरवणी परीक्षेचे शुल्काचे चलन व विद्यार्थ्यांच्या याद्या २७ जून २०२३ पर्यंत मंडळ कार्यालय, नाशिक येथे जमा करण्याबाबत निर्देश प्राप्त झाले आहेत.(Send board representative for invoices lists Teachers Association Proceedings of Secondary School Certificate Examination Dhule News)

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी दिलेल्या निर्देशानुसार माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२३ मध्ये प्रविष्ट न झालेले व अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी शंभर टक्के पुरवणी परीक्षेकरिता प्रविष्ट करावे याबाबत आदेशित केले आहे.

विद्यार्थिसंख्या जास्त

धुळे जिल्ह्यातील माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र पुरवणी परीक्षेसाठी आवेदनपत्र सादर करणाऱ्या शाळा व विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. तसेच ज्या शाळेतील परीक्षेकरिता एक विद्यार्थी प्रविष्ट आहे अशा शाळांना प्रत्यक्ष मंडळ कार्यालयात साहित्य जमा करण्यासाठी ये-जा करण्याचे काम वेळखाऊ व खर्चिक आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तसेच धुळे जिल्ह्यातील सर्व शाळांना साहित्य जमा करण्यासाठी मंडळ कार्यालय नाशिक येथे पोचणे हेदेखील वेळखाऊ व खर्चिक आहे. काही शाळा विनाअनुदानित व अंशतः अनुदानित आहेत. या शाळांना वेतनेतर अनुदान नाही.

जे काम मंडळाचा एक प्रतिनिधी करू शकतो, त्या कामासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांना वेठीस धरणे कितपत योग्य आहे, असा प्रश्‍न उपस्थित करत. या सर्व बाबींचा सहानुभूतीने विचार करून धुळे जिल्ह्याच्या संकलित केंद्रावर मंडळ प्रतिनिधीमार्फत हे साहित्य जमा करावे, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT