धुळे : मालमत्ता कर थकबाकीदारांविरोधात महापालिकेच्या मालमत्ता विभागाकडून नियमितपणे कारवाई सुरू आहे. मंगळवारी (ता.२९) देखील पथक शहरातील देवपूर भागातील बंग व्यापारी संकुलातील थकबाकीदार गाळेधारकावर कारवाईसाठी गेले होते. दरम्यान, थकबाकीदाराने काही रक्कम अदा केल्याने त्यांच्यावरील कारवाई टळली.
बंग व्यापारी संकुलातील तिसऱ्या मजल्यावर जीओ कंपनीची गॅलरी आहे. त्यांच्याकडे एकूण आठ ६५ हजार रुपये थकबाकी असल्याने मंगळवारी (ता.२९) महापालिकेचे जप्ती पथक तेथे धडकले. दरम्यान, संबंधित थकबाकीदाराने तीन लाख ८७ हजार रुपयांचा धनादेश पथकाला दिला. त्यामुळे पथकाने जप्तीची कारवाई स्थगित केली.(Session of action against defaulters started Municipality Payment of check avoided action Dhule News)
हेही वाचा : काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली??
महापालिकेचे वसुली अधीक्षक शिरीष जाधव, मधुकर निकुंभे, निरीक्षक मुकुंद अग्रवाल, अजय देवरे, प्रसाद चाळे, अशोक चौधरी यांच्या पथकाने ही कारवाई केली. शहरातील एका मोबाईल टॉवरच्या थकबाकीदारासह इतरांकडेही पथक गेले होते.
मात्र, त्यातील काहींनी थकबाकीची रक्कम अदा केल्याने त्यांच्यावरही कारवाई झाली नाही. दरम्यान, जप्तीसारखी कटू कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदारांनी आपल्याकडील थकबाकी अदा करावी असे असे आवाहन महापालिकेच्या कारवाई पथकाने केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.