gambling 123.jpg 
उत्तर महाराष्ट्र

मोबाईलमध्ये रोलेट, बिंगो जुगार सुरु होता...अचानक 'त्यांची' एंट्री झाली ...मग..

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरातील फॅशन स्ट्रीट अशी ओळख असलेल्या कॉलेज रोड परिसरात मोबाईलमध्ये रोलेट, बिंगो जुगार इन्स्टॉल करून त्याच्या खेळातून पॉइंटच्या आधारे पैसे उकळणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांनी गुरुवारी (ता. 19) छापा टाकला. या प्रकरणी आयुक्तालयाच्या अवैध धंदेविरोधी पथकाने सात जणांविरोधात गुन्हा दाखल करीत सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. 

असा घडला प्रकार...

कॉलेज रोडवर श्रद्धा पेट्रोलपंपाशेजारी असलेल्या एस. के. ओपन मॉलच्या तळमजल्यावरील गाळ्यात ऑनलाइन रोलेट जुगारअड्डा सुरू असल्याची खबर अवैध धंदेविरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाचे सहाय्यक निरीक्षक कुंदन सोनोने यांनी गुरुवारी (ता. 19) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सापळा रचून छापा टाकला. त्या वेळी मोबाईल व इंटरनेटच्या माध्यमातून मोबाईल फोनवर बिंगो-रोलेट जुगार इन्स्टॉल करायचे. त्यावर आकड्यावर रोलेट जुगार खेळून त्या गेमच्या पॉइंटवर पैसे लावले जात आणि ते संशयितांकडून वसूल केले जात होते. संशयित जोगंदर ऊर्फ पप्पू शहा जुगाऱ्यांकडून पैसे घेऊन त्यांना पॉइंट देत असल्याचे उघडकीस आले. 

घटनास्थळावरून पोलिसांनी एक लाख 35 हजार 10 रुपयांची रोकड, वाहन, जुगाराचे साहित्य, मोबाईल असा एकूण चार लाख 89 हजार 770 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी गंगापूर पोलिसांत गाळामालक पप्पू शहा, राहुल पटेल, जसविंदर सिंग, किरण ढोकळे, कमलेश मंडल, राकेश जाधव, कैलास शहा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कामगिरी पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कुंदन सोनोने, सहाय्यक उपनिरीक्षक विजय शिरसाठ, पोलिस नाईक सारंग वाघ, पोलिस शिपाई गजानन पवार, सूरज गवळी आणि संतोष वाघ यांच्या पथकाने बजावली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सलग तिसऱ्या दिवशी सोनं स्वस्त! 20 दिवसांतील सर्वात कमी दर, 10 तोळ्यांमागे 36,500 रुपयांची घसरण; पाहा आजचा भाव

Miraj PSI Death : मिरजेतील पीएसआयने कॉल, मेसेजला उत्तर दिलं नाही; नंबर ट्रॅक लावला अन् घटनास्थळी पाहताच, एसपींसह सांगली पोलिसांना बसला धक्का

Latest Marathi News Live Update : ग्रामीण भागातही गॅससाठी रांगा, मोवाड-नरखेडमध्ये नागरिकांची सकाळपासून गर्दी

Nashik: कुंभमेळ्याची तयारी सुरु असताना नाशिकला ‘पाण्याचा आशीर्वाद’? अंडरपास खोदकामात सापडली १२५ वर्षांपूर्वीची पाण्याने भरलेली विहीर

Kolhapur Money Fraud : नफ्याच्या आमिषाने २१ लाखांची  फसवणूक ; संशयित गडहिंग्लजचा, व्यापारी चंदगडचा

SCROLL FOR NEXT