shahada market committee election esakal
उत्तर महाराष्ट्र

Market Committee Election : निवडणूक रणसंग्रामात उतरण्यासाठी पदाधिकारी ठाम; परिवर्तनाचा सूर

कमलेश पटेल

शहादा (जि. नंदुरबार) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी (Market Committee Election) सातपुडा साखर कारखान्याचे अध्यक्ष दीपक पाटील व जिल्हा परिषदेचे माजी सभापती अभिजित पाटील या दोन्ही नेत्यांनी आपापल्या गटाचा स्वतंत्र बैठका घेऊन निवडणुकीबाबत पदाधिकारी व संबंधित मतदारांशी चर्चा घडवून आणली. (shahada market committee election Officials determined to enter election battle nandurbar news)

आता पाटीलद्वयी निवडणुकीसंदर्भात काय भूमिका घेतात याकडे कार्यकर्त्यांचे व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दोन्ही गटात समेट होतो की निवडणुकीचा रणसंग्राम होतो हे लवकरच समजेल. मात्र पदाधिकारी निवडणुकीवर ठाम आहेत.

पदाधिकारी निवडणुकीवर ठाम

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी १८ जागांसाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बाजार समितीची निवडणूक झाली नाही. बिनविरोध होत आहे. त्यात गेल्या दोन वर्षांपासून बाजार समितीवर प्रशासक होते. मात्र यंदा निवडणुकीची चर्चा होत आहे.

विनिमय बैठकीत कार्यकर्त्यांनी निवडणुकीत पॅनल उभे करून निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला आहे. मात्र सत्ताधारी व विरोधी गट काय भूमिका घेतात याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. तीन एप्रिल पर्यंत उमेदवारी दाखल करण्याची मुदत आहे, त्यामध्ये सुट्ट्या आल्याने उमेदवारी दाखल करण्यासाठी अल्पकाळ उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

असे आहेत मतदार

येथील बाजार समिती जिल्ह्यात अग्रगण्य आहे. विविध कार्यकारी सेवा सोसायटी मतदार संघात ११ जागा असून ९८४ मतदार आहेत.ग्रामपंचायत मतदार संघात चार जागा १३९० मतदार, व्यापारी मतदारसंघाच्या दोन जागा २५० मतदार तर हमाल मतदार संघात एक जागा २११ मतदार मतदानाच्या हक्क बजावतील.

पक्षापेक्षा व्यक्ती केंद्रित निवडणूक

दरम्यान, येथील बाजार समितीच्या निवडणुकीत कोण कोणत्या राजकीय पक्षात आहे यापेक्षा व्यक्ती केंद्रित निवडणुकीला जास्त महत्त्व असल्याचे सूर उमटत आहेत. तालुक्याच्या राजकारणात सातपुडा साखर कारखान्याचे अध्यक्ष दीपक पाटील गटाचे व माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष मोतीलाल पाटील गटाचे राजकीय सौख्य सर्वश्रुत आहे.

आज पर्यंत अनेक सहकार तत्त्वावरील व अन्य निवडणुकांमध्ये दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी निवडणुका लढवल्या गेल्या. त्यात यश अपयश आले. सध्या तरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत परस्परविरोधी पॅनल उभे ठाकल्यास कोण कोणत्या पक्षात आहे, यापेक्षा कोणत्या व्यक्तीचे पॅनल कोणते याला अधिक महत्त्व प्राप्त होणार आहे.

बाजार समितीत आजपर्यंत अनेक वर्षे (स्व.) पी. के. अण्णा पाटील गटाची एकहाती सत्ता होती. परंतु, आता विरोधी गटाच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी परिवर्तन हवे असा सूर लावल्याने निवडणूक अटळ आहे असा कयास जाणकारांकडून बांधला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025, INDW vs ENGW: दीप्ती शर्माने घडवला इतिहास! 'असा' पराक्रम करणारी भारताची पहिलीच महिला क्रिकेटपटू

Latest Marathi News Live Update : पुण्यातील चव्हाण वाडात चिमण्या गणपती जवळ आगीची घटना

Deglur Temple Theft : देगलूर तालुक्यातील वझर येथील भवानी मंदिरातील दानपेटी व दागिन्यांची चोरी; परिसरात खळबळ

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात सात दिवस धोक्याचे! पावसाबाबत मोठी अपडेट समोर, हवामान विभागाकडून इशारा जारी

Lawrence Bishnoi: वेळीच स्वतःला सुधारा नाहीतर...; लॉरेन्स बिश्नोई टोळीला उघड इशारा, धमकी देणारा रोहित गोदरा नेमका कोण?

SCROLL FOR NEXT