Dhule: Revenue staff taking patient's signature on land acquisition compensation documents at Jawahar Hospital.
Dhule: Revenue staff taking patient's signature on land acquisition compensation documents at Jawahar Hospital. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : शासन आपल्या दारी...पण व्हाया रुग्णालय...!; भूसंपादनाचा रूग्णाला मिळवून दिला लाभ

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत ‘शासन आपल्या दारी’ अभियान राबविण्यात येत आहे.

त्यात एक जण रूग्णालयात दाखल असल्याने त्याला शासन आपल्या दारी...पण व्हाया जिल्हा रुग्णालय याव्दारे भूसंपादनाचा लाभ मिळवून देण्यात आला. (Shasan Aplya dari yojana approved by hospital Land acquisition benefited patient Dhule News)

जिल्ह्यात पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली अभियानाची अंमलबजावणी सुरु आहे. ते यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा वेळोवेळी विभागप्रमुखांच्या बैठका घेत मार्गदर्शन करीत आहेत.

या अभियानात धुळे जिल्ह्यात लाखापेक्षा जास्त पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. त्यानुसार विविध खातेप्रमुख आपल्याकडील योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे.

धोडमिसे यांचा प्रत्यय

सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तृप्ती धोडमिसे या आपल्या सकारात्मक कार्यशैलीमुळे प्रसिद्ध आहेत. राज्य शासनाच्या सुरु असलेल्या शासन आपल्या दारी या उपक्रमातून त्यांनी आगळा वेगळा आदर्श घालून देत खऱ्या अर्थाने शासन लाभार्थ्यांच्या दारापर्यंत नेले आहे.

तापी नदीवरील सुलवाडे- जामफळ- कनोली ही उपसा सिंचन योजना महत्वाकांक्षी असून जिल्ह्यासाठी जीवनदायी ठरणार आहेत. त्यामुळेच प्रधानमंत्री कार्यालयाची या योजनेवर देखरेख आहे. जिल्हाधिकारी शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी योजनेतील भूसंपादनाच्या कामाला गती दिली आहे.

मोबदलाप्रश्‍नी बैठक

सुलवाडे- जामफळ- कनोली उपसा सिंचन योजनेअंतर्गत कुंडाणे (वे., ता. धुळे) येथील भूसंपादन प्रस्ताव क्रमांक ८१/२०१८ यातील संपादीत गट नं. ९/२/अ चे मूळ जमीनधारक भागवत उत्तम पाटील व गट नं ९/४ यातील मूळ जमीनधारक उत्तम यादव पाटील हे मृत असल्याने त्यांच्या वारसांकडून संपादित क्षेत्राचा मोबदला मिळण्यासाठी जिल्हा न्यायालयातील कायदेशीर वारस तक्ता सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांच्या कार्यालयात सादर केला.

त्यानुसार भूसंपादन अधिकाऱ्यांकडून सर्व कागदपत्रांची तपासणी, सर्व संबंधितांना उपरोक्त गटातील संपादीत क्षेत्राचा मोबदला स्वीकारण्यासाठी कार्यालयात उपस्थित रहाण्यासाठी कळविण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

रूग्णालयात दिला लाभ

त्यानुसार १ जूनला संबंधीत सर्व भूसंपादन अधिकारी श्रीमती धोडमिसे यांच्या कार्यालयात उपस्थित होते. परंतु, दोन्ही गटांत वारस असलेले बबलू भागवत पाटील हे प्रकृती गंभीर असल्याने जवाहर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत होते.

ते कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नसल्याचे संबंधितांच्या नातेवाईकांनी श्रीमती धोडमिसे यांच्या निदर्शनास आणून दिले. याअनुषंगाने श्रीमती धोडमिसे यांनी कार्यालयीन कर्मचाऱ्यांना तात्काळ जवाहर रुग्णालयात पाठविले.

कर्मचारी डी. बी. पाटील, सुरेश वानखेडे यांनी रुग्णालयात रुग्ण बबलू भागवत पाटील यांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या परवानगी जमीन मोबदलाच्या आवश्यक कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या घेतल्या. प्रशासनाच्या या कामगीरीमुळे श्रीमती तृप्ती धोडमिसे यांनी ‘शासन आपल्या दारी’चा प्रत्यक्ष प्रत्यय आणून दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात अडकले दिल्लीचे धुरंधर, पण कुलदीपच्या फिनिशिंग टचमुळे कोलकातासमोर 154 धावांचं लक्ष्य

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT