Nana saheb maharaj
Nana saheb maharaj  esakal
उत्तर महाराष्ट्र

Shivmahapuran Katha: आई वडीलच शिव-पार्वती : नानासाहेब महाराज

सकाळ वृत्तसेवा

धुळे : श्री शिवजी हेच खऱ्या‍ अर्थाने हरी हर आहेत आणि ब्रह्मजी एक अद्‌भुत शक्ती आहे. एक पृथ्वी प्रदक्षिणा करण्याचे फळ मिळवायचे असेल, तर गणरायांनी श्री शिव-पार्वतीला वंदन करत प्रदक्षिणा घातली. त्याप्रमाणे सर्वांनी रोज आई व वडिलांना वंदन करून दिवसाची सुरवात करावी. (Shiv Mahapuran katha statement of nana saheb maharaj on mom dad is god dhule news)

आई आणि वडील हेच आपले शिव-पार्वती आहेत, असे नानासाहेब महाराज (उडाणेकर) यांनी श्री शिवमहापुराण कथेत सांगितले. शहरातील नकाणे रोडवरील स्वामी विवेकानंद कॉलनीत २६ जानेवारीपर्यंत रोज रात्री आठ ते दहा या वेळेत श्री शिवमहापुराण कथेचे निरूपण होईल.

कथेच्या सुरवातीला एसआरपी कॉलनीतील श्री महादेव मंदिर येथून शोभायात्रा निघाली. पहिल्या दिवशी नानासाहेब महाराज यांनी श्री शिवमहापुराणाचे महत्त्व सांगितले. तसेच श्रीगणेशाची भक्ती विशद केली. कथेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

गुरुवारी (ता. २६) दुपारी तीन ते पाचदरम्यान शिवमहापुराण कथा होईल. नंतर सायंकाळी पाचपासून भारतमाता पूजन व ११ लाख ११ हजार १०८ शिवलिंग विसर्जन, शोभायात्रा व महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. भाविकांना उपस्थितीचे आवाहन आयोजकांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस पुन्हा गोत्यात! भाजप मुद्दा पेटवणार, जयराम रमेश यांची सारवासारव

वाढदिवस साजरा करुन परतताना काळाचा घाला! तासगाव-मणेराजुरी मार्गावर कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील 5 जण ठार

Latest Marathi News Live Update : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात महिला मतदारांची बाजी

Share Market Today: आज शेअर बाजारात कोणते शेअर्स खरेदी कराल? कशी असेल बाजाराची स्थिती?

Cucumber Sandwich Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा काकडीचे चवदार सॅंडविच, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT