short film on sanitary napkin awareness is made by kusumba gram panchayat dhule news
short film on sanitary napkin awareness is made by kusumba gram panchayat dhule news esakal
उत्तर महाराष्ट्र

Short Film | कुसुंबा ग्रामपंचायतीर्फे ‘परिवर्तन : A Biginning’ लघुपट

सकाळ वृत्तसेवा

कुसुंबा (जि. धुळे) : मासिक पाळीप्रसंगी वापरल्या जाणाऱ्या सॅनिटरी नॅपकिनमधील प्लॅस्टिक जैव विघटनशील नसते. यामुळे आरोग्य व पर्यावरणाला धोका निर्माण होऊ शकतो.

या विषयावर जनजागृती करून सॅनिटरी नॅपकिन नैसर्गिक पद्धतीने बनवून त्याची विल्हेवाट व व्यवस्थापन जनजागृती या लघुपटातून (Short Film) दाखविण्यात आली आहे. (short film on sanitary napkin awareness is made by kusumba gram panchayat dhule news)

महिलांच्या मासिक पाळी व्यवस्थापन या विषयावर राज्यातील ग्रामपंचायतींसाठी राष्ट्रीय पातळीवर चित्रपट स्पर्धा होत आहे. त्यानुसार धुळे जिल्हा परिषद पाणी स्वच्छता विभागाकडून संबंधित ग्रामपंचायतींना पत्रही देण्यात आले आहे. स्वच्छ भारत टप्पा-२ अभियानाला गती मिळण्यासाठी व लोकसहभागाला चालना देण्यासाठी चित्रपट स्पर्धेचे केंद्र सरकारतर्फे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेत कुसुंबा ग्रामपंचायतीने ‘परिवर्तन ः A Biginning’ हा लघुपट सहभाग म्हणून नोंदविला आहे. लघुपटात रासायनिक व प्लॅस्टिकमुक्त शोषकांची विल्हेवाट लावून त्यावरील उपाययोजना, व्यवस्थापन दाखवून नैसर्गिक सॅनिटरी नॅपकिन बनवून जनजागृतीचा संदेश देण्यात आला आहे. वापरलेल्या पॅडची विल्हेवाट कशी लावावी, हे दृश्य स्वरूपात दाखविण्यात आले आहे.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच मोराणे येथील माध्यमिक शिक्षक धनंजय लोटन पाटील (मोराणे प्र.नेर) यांच्या बंगला परिसरात झाले. त्यासाठी धनंजय पाटील यांचे सहकार्य लाभले. कुसुंब्यातील लघुचित्रपटकार शेख इम्तियाज यांनी लेखन व दिग्दर्शन केले असून, निर्माते अनिल प्रेमाणी आहेत. मुख्य कलाकार म्हणून चित्रपट ‘दृश्यम’, ‘इरसल’ व ‘ख्वाडा’फेम अनिल नगरकर, प्रेरणा गायकवाड, अमित शेख, विनोद शिंदे, सेजल वैष्णव यांनी अभिनय साकारले आहेत.

कॅमेरामन अविनाश लोहार, संकलन अमोल देठे यांनी केले असून, यासाठी सरपंच शोभाबाई शिंदे, उपसरपंच स्वाती जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्या वैशालीताई शिंदे, ग्रामविकास अधिकारी बी. एस. पाटील, डॉ. शरद जोशी, अशपाक शेख, आरटीओ धनराज शिंदे, मुस्ताक शेख, कुणाल शिंदे, धनंजय पाटील (मोराणे प्र.नेर),

फिरोज टेलर, हेमंत पाटील, केंद्रप्रमुख नंदकिशोर बैरागी, रणजित शिंदे, गणेश चौधरी, मनोज परदेशी, मायकल चौधरी, सलमान मिर्झा, प्रशांत जिरे, अमजत शेख, उत्तम पाटील, सतीश चौधरी, अपना ग्रुप आदींचे सहकार्य लाभले. यूट्यूबसह इतर सोशल मीडियावर लवकरच चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT