Necessity for hemophilia patients Statewide shortage of factor esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : राज्यात 4 हजारावर Hemophilia रुग्णांच्या जिवाशी खेळ!

सकाळ वृत्तसेवा

कापडणे (जि. धुळे) : हिमोफिलिया म्हणजे रक्त न गोठण्याचा आजार. हा एक आनुवंशिक आजार असून, त्यासाठी रुग्णाला वेळोवेळी तसेच काही घटनांत तत्काळ रक्तघटक असलेला फॅक्टर देणे गरजेचे असते. राज्यातील विभागीय जिल्हा रुग्णांमध्ये महागड्या फॅक्टरची मोफत सुविधा उपलब्ध करून दिली आहे.(shortage of Essentials for hemophilia patients in State dhule news)

मात्र गेल्या महिन्याभरापासून फॅक्टरचा तुटवडा निर्माण झाला आहे. नाशिकमधील जिल्हा रुग्णालयातही फॅक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांची फरफट होत आहे. तत्काळ फॅक्टर उपलब्ध करण्याची मागणी रुग्ण आणि नातेवाइकांकडून होत आहे.

रक्त न गोठण्याचे वीस प्रकारचे आजार आहेत. हिमोफिलियामध्ये तीन प्रकार आहेत. ए, बी आणि सी. यामध्ये ‘ए’ हा प्रकार मोठ्या प्रमाणावर आढळतो. दर दहा हजार व्यक्तींमागे एक हिमोफिलिया ‘ए’चा रुग्ण असतो.

दर ४० हजार व्यक्तींमागे ‘बी’चा रुग्ण असतो आणि दर दोन लाख व्यक्तींमागे ‘सी’ या प्रकारचा रुग्ण असतो. देशात ‘ए’ हिमोफिलियाचे एक लाखांवर रुग्ण असूनही केवळ २० हजार रुग्ण नोंदविलेले आहेत. ‘बी’ चे प्रमाण लोकसंख्येनुसार किमान २५ हजार असणे अपेक्षित आहे. केवळ पाच हजार रुग्णांचे निदान झाले आहे.

राज्यात आठच केंद्रांवर सुविधा

एकवीस राज्यांमध्ये काही सरकारी रुग्णालयांमध्येच फॅक्टर उपचार उपलब्ध आहेत. देशातील ७०८ जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक केंद्र हवे, जिथे हिमोफिलियाचे उपचार आणि चाचण्या होऊ शकतील. राज्यात तीन हजार ५०० रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. राज्यात केवळ मुंबई, नाशिक, रत्नागिरी, सातारा, पुणे, अहमदनगर, अमरावती, नागपूर, औरंगाबाद येथेच केंद्रे आहेत.

धुळ्यातही हवे केंद्र

धुळे, जळगाव आणि नंदुरबारमधील रुग्णांना फॅक्टरसाठी नाशिक गाठावे लागते. हिमोफिलियाग्रस्तांना नाशिक गाठताना विविध अडचणींना सामना करावा लागतो. फॅक्टरची सुविधा धुळे जिल्हा रुग्णालयात उपलब्ध झाल्यास जवळ मोठी सोय होईल. यासाठी प्रशासनाने दखल घेत कार्यवाही करण्याची गरज आहे. हिमोफिलियाग्रस्त रुग्णांना दिलासा देण्याची मागणी पीडितांकडून होत आहे. उशिराने फॅक्टर उपलब्ध न झाल्यास कायमचे अपंगत्व येण्याची भीती असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"अपमान सहन करून ते कॉरिडॉरमध्ये बसून राहायचे" रंजनाच्या अपघातानंतर अशोक मामांच्या अवस्थेबद्दल खुलासा

Pune Fraud News : शेअर बाजारात चांगल्या परताव्याच्या आमिषाने ज्येष्ठाची दीड कोटींची फसवणूक

Rain-Maharashtra Latest Live News Update: शेतात विजेच्या धक्क्यामुळे एकाच कुटूंबातील पाचजण ठार

Online Gaming Bill 2025 : लोकसभेत 'ऑनलाइन गेमिंग विधेयक-२०२५' मंजूर!

Tirupati Balaji Temple : अशीही बालाजी भक्ती! तिरुपती मंदिरात भाविकाने दान केलं तब्बल १२१ किलो सोनं; किंमत ऐकून थक्क व्हाल....

SCROLL FOR NEXT