cctv.jpg 
उत्तर महाराष्ट्र

बोलण्यामध्ये 'त्यांना' भुरळ घातली..अन् इमारतीच्या बोळीकडे घेऊन गेला..त्यानंतर...

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : रविवार कारंजा येथे रस्त्यालगत भामट्याने भाजीविक्रेत्या महिलेच्या गळ्यातील 60 हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र हातचलाखीने लंपास केल्याची घडना घडली. संशयित समोरच असलेल्या एका इमारतीच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. 

असा घडला प्रकार... संशयित सीसीटीव्हीत कैद 

वंदना दामोधर राऊत (रा. पेठरोड, पंचवटी) असे महिलेचे नाव आहे. त्या गेल्या काही वर्षांपासून रविवार कारंजा परिसरात रस्त्यालगत भाजीपाला विक्री करतात. सोमवारी (ता. 30) सायंकाळी साडेपाच-सहा वाजेच्या सुमारास लाल शर्ट घातलेला संशयित युवक त्यांच्याकडे आला. त्याने वंदना राऊत यांना बोलण्यामध्ये भुरळ घालत त्यांना समोरच्या इमारतीच्या बोळीकडे घेऊन गेला. त्याठिकाणी त्याने राऊत यांना सांगितले की, एक श्रीमंत महिला येणार असून त्यांना गरिब आणि कष्टाळू महिलांना रोख स्वरुपात पैशांची मदत करायची आहे. मी त्यांना तुमच्याकडे घेऊन येतो. पण, तुमच्या गळ्यातील ही सोन्याची पोत काढून ठेवा असे सांगितले. राऊत यांनाही काही समजायच्या आत त्यांनी गळ्यातील मंगळसूत्र काढले. संशयिताने सुमारे दीड तोळ्याचे 60 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र त्याच्याकडील कागदामध्ये ठेवले आणि हातचलाखी करीत एक कागदाची पुडी त्यांच्याकडे दिली आणि संशयित तरुण "येतो' म्हणून निघून गेला. बराच वेळ झाल्यानंतरही संशयित युवक न आल्याने त्या परत त्यांच्या भाजी दुकानाकडे आल्या आणि त्यांच्या हातातील कागदाची पुडी उघडून पाहता त्यात दगडे होती. त्यांनी घटनेची माहिती तात्काळ पोलीसांना देण्यात आली.

पोलिसांचा अधिक तपास .  

सरकारवाड्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत सोमवंशी घटनास्थळी पोहोचले. ज्याठिकाणी घटना घडली त्याच परिसरात एका कुरियरच्या कार्यालयाच्या सीसीटीव्हीमध्ये संशयिताची छबी कैद झाली आहे. त्यावरून पोलिस तपास करीत आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk Price Hike: दसरा-दिवाळीआधीच दूध महागणार? तब्बल 8 रुपयांची वाढ! सरकारला 3 दिवसांचा अल्टिमेटम

Asian Games 2026: मुंबईच्या पोरीची जपानमध्ये हवा! Quimcy Dsouza ऐतिहासिक पदक जिंकण्याच्या उंबरठ्यावर; ती खेळते, तो Teqball नक्की आहे तरी काय?

शेतकरी दुष्काळाने होरपळतोय, नेते खातायत सुकामेवा, आढावा बैठकीत काजू बदामचा नाश्ता

IIT Bombay ChatGPT Incident : IIT बॉम्बे विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर अधिकृत खुलासा; शिस्तभंगाची कारवाई केली होती का? संस्थेने सांगितलं सत्य

प्रसूतीनंतर ५० दिवस मृत्यूशी झुंज, स्तनदा मातेला वाचवण्यासाठी डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न; उपचारानंतर मिळालं जीवनदान!

SCROLL FOR NEXT