Leopard Attack esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : बिबट्याच्या हल्ल्यात सालदार जखमी

सकाळ वृत्तसेवा

चिमठाणे : येथील निशाणे रस्त्यालगतच्या गाव शिवारात मंगळवारी (ता. २८) रात्री आठच्या सुमारास गहू पिकासाठी पाणी देण्यासाठी मोटारसायकलवर सालदार जात असताना अचानक बिबट्याने हल्ला केल्याने हातावर व पायाला पायाचा पंजा मारल्याने किरकोळ जखमी केले आहे.

बुधवारी (ता. २८) सकाळी वन विभागाचे कर्मचारी यांनी गावशिवरात भेट दिली आसता पायाच्या पंजावरून मादी बिबट्यांचे व दोन-तीन बछडे असल्याचा कयास लावण्यात आला आहे. (Soldier injured in leopard attack dhule news)

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

येथील गावशिवरातील शेतात सोमवारी (ता. २६) रात्री गहू पिकाला पाणी देण्यासाठी गेले असता मक्याच्या शेतात रात्री एक-दीडच्या सुमारास बिबट्याच्या हल्यात रानडुकरचा फडशा पाढल्याचे प्रथम दर्शनी पाहणारया शेतकरी व मजूरानी सांगितले. बिबट्याचा परिसरात शेतशिवारात वावर असल्याने रात्रीपाळीत विहिरीचे व पाटांचे पिकांना पाणी भरणारया शेतकरी व सालदार भयभीत झाले आहेत.

मंगळवारी रात्री आठच्या सुमारास येथील शेतकरी योगेश ऊर्फ बाळू वंजी वाणी यांचा सालदार कैलास ऊर्फ सिधी नुरमल पावरा (वय २८, नवादेवी, ता. शिरपूर) गहू पिकास पाणी देण्यासाठी मोटारसायकलवर जात असताना अचानक बिबट्याने हल्ला केल्याने उजव्या हाताला व पायाला पंजा मारल्याने जखमी केल्याने त्याला चिमठाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. पावरा यांनी प्राथमिक उपचार केला.

बुधवारी सकाळी शिंदखेडा वनविभागाचे वनरक्षक भरत बोरसे, वनमजूर छोटू कोळी व जितू गिरासे यांनी घटनास्थळी भेट दिली असता मका व पपईच्या शेतात मादी जातीचे व दोन- तीन लहान बछडे यांचे पंजे असल्याची शक्यता आहे. बुधवारी सायंकाळी चार नाइट ङिव्हीजन कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jat Municipality Photo Dispute : जत पालिकेची सभा छायाचित्राच्या वादात; मुख्यमंत्री-आमदारांच्या फोटोवरून जोरदार खडाजंगी, काँग्रेसचा सभात्याग

Borkhind Samruddhi Highway Interchange : नाशिकला समृद्धी महामार्गाचा थेट फायदा! बोरखिंड इंटरचेंजला मुख्यमंत्र्यांची मंजुरी, 343 कोटींचा निधी जाहीर

BABAR AZAM: शतक झालं नाही, तरी बाबर आझमने इतिहास रचला! ७६ धावांच्या खेळीने विराट-पाँटिंगच्या खास क्लबमध्ये एन्ट्री, नेमका कोणता विक्रम?

Marathi News Live Updates : कोकणवासियांचा खोळंबा! मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रचंड वाहतूक कोंडी

“मी जीवन संपवतोय…” ‘नवरा माझा नवसाचा’ फेम अभिनेत्याची खळबळजनक पोस्ट; पोलिसांची धावाधाव

SCROLL FOR NEXT