Adequate storage in Jamphal Dam  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Water Shortage : सोनगीरला पाणीटंचाई..! महिन्यात फक्त तीनदा नळांना पाणी

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : येथील पाझर तलाव आटल्याने तसेच जामफळ धरणात पाणी असूनही धरणाचा विस्तार करताना मुख्य स्त्रोतांची जलवाहिनी तोडण्यात आल्याने गावाला पाणीटंचाई जाणवत आहे. (Songir village is facing water shortage due to main sources of water being cut off dhule news)

महिन्यात केवळ तीनदा म्हणजे दहा दिवसाआड पाणी मिळत आहे. जामफळ प्रकल्पाचे काम पूर्ण होण्यास दोन तीन वर्षे लागतील तोपर्यंत गावाने पाणी टंचाई सहन करावे का असा प्रश्न आहे. तोडलेली जलवाहिनी पुन्हा जोडून पाणीटंचाई दूर करावी अशी मागणी आहे.

पाझर तलाव, जामफळ धरणाजवळील विहीर व अन्य तीन कूपनलिकांद्वारे पाणी मिळवले जाते. ते प्राचीन सार्वजनिक विहिरीत व तेथून घरोघरी नळाद्वारे पाणी पुरवले जाते. सुमारे ३० हजार लोकवस्तीच्या गावाला दरदिवशी व दरडोई किमान ४० लिटर पाणी दिले तरी दररोज १२ लाख लिटर पाण्याची आवश्यकता असते.

गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने विहिरी, तलाव तुडुंब भरले होते. मात्र एप्रिलपासून तलाव आटल्याने मुख्य पुरवठा बंद झाला. याशिवाय जामफळ धरणाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू असल्याने एक वगळता सर्व स्रोत बंद पडले आहेत. धरणातील मुख्य स्त्रोतांची जलवाहिनी काढून टाकण्यात आली आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

बोहरी स्मशानभूमी, आनंदवन संस्थान येथील कूपनलिका २४ तास व अर्जुन मराठे यांच्या शेतातील कूपनलिकेद्वारे सुमारे १२ तास अशा चार स्रोतांतून पाणी मिळत आहे. ते गावात वेगवेगळ्या दिवशी व वेगवेगळ्या वेळी पुरवठा केला जातो. ग्रामस्थांना दहा दिवसात एकदाच पाणी मिळते. पाणी साठा करून ठेवण्यासाठी त्याप्रमाणात गरिबांकडे भांडी नसल्याने उन्हाळ्यात हाल सोसावे लागते.

धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर भरपूर पाणी मिळेल पण तोपर्यंत काय हा प्रश्न आहे. म्हणूनच जामफळ प्रकल्पाचे काम सुरू ठेवा. परंतु, धरणातील विहिरीतून पाणी मिळण्यासाठी तोडलेली जलवाहिनी जोडणे हा एकमेव पर्याय आहे. लवकरच पंचायत समिती व जिल्हा परिषदेने उपाययोजना करावी अशी मागणी आहे. प्रकल्प ठेकेदाराने जलवाहिनी न जोडल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा सरपंच रुखमाबाई ठाकरे व सदस्य तसेच ग्रामस्थांनी दिला आहे.

७५ टप्प्यात पाणीपुरवठा

गावात १९७३ पासूनची पाणीपुरवठा योजना सुरू आहे. लोकसंख्या वाढली तसे घरोघरी नळ आले. त्यामुळे गावांतर्गत जलवाहिनीवर भार वाढला. त्यामुळे थोड्या वस्तीसाठी एक तास असे ७५ टप्प्यात पाणी सोडले जाते. सोनगीरसाठी १७ लाखाची योजना मंजूर आहे. त्यात गावातील मुळ पाणीपुरवठेची जलवाहिनी काढून नवीन बसविण्यात येणार आहे. शिवाय पंपगृह, जलशुद्धीकरण आदी तयार होणार आहे. मात्र तोपर्यंत पाणीटंचाई दूर करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT