An outbreak of soybean mosaic virus in a field in Shiwar. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Agriculture News : सोयाबीन पिकावर मोझॅक व्हायरसचा प्रादुर्भाव; कापूस पिकालाही फटका

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Agriculture News : बोरद परिसरात सोयाबीन पिकावर मोझॅक व्हायरसाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंतेत असल्याचे दिसत आहे.

बोरद परिसरात गेल्या वर्षीच्या तुलनेत सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली होती. शेतकऱ्यांनी महागडे बियाणे आणून मोठ्या अपेक्षेने सोयाबीन पेरणी केली. (Infection of soybean mosaic virus nandurbar news)

एकरी सहा-सात हजार रुपये खर्च केला. मात्र पावसाच्या अनियमिततेमुळे सोयाबीनला बहार येत असताना पावसाने महिनाभर दडी मारली होती. त्यामुळे बहार गळून पडला. पाण्याचा ताण पडल्याने पिकांची रोगप्रतिकारकशक्ती कमी झाली.

त्यामुळे विविध रोगांना पोषक वातावरण निर्माण झाले. परिणामी पिकांवर येलो मोझॅकसारख्या रोगाचा प्रादुर्भाव झाला. अनेकांच्या शेतात झाडे पिवळी पडून ती पूर्णतः सुकून गेली. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे उत्पादन होणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला. सोयाबीन पिकावर केलेला खर्चदेखील वाया जाणार आहे. सोबत खर्च वाढत असून, उत्पादन घटणार आहे.

बोरद परिसरात शेतकऱ्याने अस्मानी संकटावर मात करत बदलत्या हवामानाचा फटका कापूस पिकालादेखील बसला असून, लागवड होऊन वेळेवर न आलेला पाऊस व पावसाच्या अनियमितेमुळे कपाशीवर व्हाइट प्लाय, मिलिबग रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे.

शेतकऱ्याने कापसावर एकरी दहा-पंधरा हजार खर्च केला असून, रोगांमुळे उत्पादनात घट होण्याची भीती आहे. त्यामुळे खर्चही अधिक व उत्पादन कमी अशा स्थितीस शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागणार असल्याचे शेतकरी भीती व्यक्त करीत आहेत.

पीकविमा रकमेची मागणी

शेतकरी महागडी बियाणी, खते वापरून शेती करतो. या वर्षी अनियमित व उशिरा पाऊस पडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या या सर्व बाबींचा विचार करून तत्काळ ५० टक्के पीकविमा रक्कम देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

''मी दीड एकर क्षेत्रात या वर्षी २० हजार रुपये खर्च करून सोयाबीनची लागवड केली. मात्र पाऊस वेळेवर न आल्याने व रोगामुळे खर्च निघणेदेखील कठीण आहे, मी महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून ४० हजार रुपयांचे कर्ज घेतले आहे. मात्र सातत्याने होणाऱ्या नापिकीमुळे तेदेखील परत करू शकलेलो नाही.''-गणेशपुरी गोसावी,

शेतकरी, खरवड

''मी पाच एकर क्षेत्रात सोयाबीनची लागवड केली. एकरी सात हजार रुपये खर्च झाला. ऐन वेळेवर पाऊस न आल्याने सोयाबीनला आलेला बहार गळून पडला. त्यामुळे पुन्हा बहार आलाच नाही. उत्पन्न तर नाहीच, खर्चदेखील वाया गेला. शासनाने लक्ष देऊन शेतकऱ्यांला मदत करणे आवश्यक आहे.''-इसाक याकूब तेली ,शेतकरी, बोरद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Shubman Gill : शुभमन गिलची स्पर्धेतून माघार; ब्लड टेस्टनंतर फिजियोने BCCI ला पाठवला अहवाल अन्...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : खड्ड्यांनी ठप्प वाहतूक! करंजाळी घाटात बससह चार वाहने अडकली

SCROLL FOR NEXT