Crime News esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : आयजींचा जुगारअड्ड्यावर छापा; 66 लाखांचा मुद्देमाल ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : बंद पडलेल्या पोल्ट्रीफार्ममध्ये चादरी टाकून झन्नामन्ना जुगाराचा डाव सुरू असताना नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाने छापा टाकून ५४ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले.

त्यापूर्वी पोलिसांना पाहून काहींनी चारचाकी गाड्या जागेवर सोडून पळ काढला. तब्बल ६६ लाख ४५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. त्यात १३ लाख २९ हजारांच्या रोख रकमेचा समावेश आहे. (Special Inspector General of Police raid gambling den and seized 66 lakh worth of valuables dhule crime news)

सांगवी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पळासनेर गावाजवळ जय माता दी ढाब्यामागे पत्र्याच्या शेडमध्ये जुगारअड्डा चालविला जात असल्याबाबत विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांना माहिती मिळाली होती.

त्यांच्या आदेशानुसार नियुक्त विशेष पथकाने २१ जूनला रात्री छापा टाकला. डाव रंगलेला असताना पोलिसांची चाहूल लागल्याने जुगारी बिथरले. त्यांची एकच धावपळ उडाली. मात्र पोलिसांनी जुगारअड्ड्याची सर्वच दिशांनी नाकाबंदी केली. तथापि, अंधार व नाल्याचा आडोसा घेऊन पळण्यात काही जण यशस्वी ठरले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

घटनास्थळावरून पोलिसांनी जुगारअड्डा चालविणाऱ्या चौघांसह तब्बल ५४ जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत १३ लाख २९ हजार रुपयांची रोकड, दोन लाख ५६ हजार रुपये किमतीचे ४६ मोबाईल फोन, दोन लाख रुपये किमतीच्या सहा दुचाकी, ४८ लाख ५० हजार रुपये किमतीच्या आठ चारचाकी गाड्या व १० हजार रुपये किमतीचे दोन गालिचे असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

जुगारअड्डा चालविल्याच्या संशयावरून जागामालक सुभाष शिंदे, राघव शिरसाट, तर झन्नामन्ना जुगार खेळल्याच्या संशयावरून अन्य संशयितांविरोधात सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अटक केलेल्या जुगाऱ्यांमध्ये मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील रहिवाशांचा भरणा आहे. मध्य प्रदेशातून पळासनेरला येऊन मोठ्या प्रमाणावर जुगार खेळविण्यात येत असल्याचा संशय आहे. महाराष्ट्रातून अमळनेर, पळासनेर व दोंडाईचा येथून तेथे जुगारासाठी गेलेल्यांनाही ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमुळे पोलिस दलातही खळबळ माजली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१० मिनिटात वस्तू हातात पोहोचवणाऱ्या Blinkitला FDAचा दणका, छापा टाकताच गोदामातलं दृश्य पाहून अधिकारी चक्रावले

IPL 2027 TRADE: हार्दिक पांड्याला ट्रेड करताय का? CSK, KKR सोडून आणखी ३ फ्रँचायझी उतरल्या शर्यतीत; Mumbai Indians म्हणते...

Marathi News Live Updates: विरोधक चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप करत सत्ताधारी खासदारांचा संसदेकडे मोर्चा

Kumbh Mela Fraud: कुंभमेळ्यात बनावट वर्कऑर्डर, ५०० ते ६०० कोटींची फसवणूक; मंत्री गिरीश महाजन यांनी दिली धक्कादायक माहिती

Ajay Devgn: सिंघम आता ‘क्राईम पेट्रोल’मध्ये! अजय देवगणने १५ भागांचं शूटिंगही केलं; अनुप सोनींची जागा घेणार?

SCROLL FOR NEXT