Adv. Narendra Marathe, Agrapramukh Kishore Ahirrao and villagers. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : स्वातंत्र्यानंतर विजापूरला पहिल्यांदाच पोचली एसटी बस; अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाल्यानंतरही साक्री शहरापासून अवघ्या दहा ते बारा किलोमीटरवर असलेल्या विजापूर पाडा या छडवेल (प) (ता. साक्री) ग्रामपंचायत अंतर्गतच्या पाड्यावर अजूनही एसटी बस पोचलेली नव्हती.

त्या पाड्यावर सोमवारी (ता. २३) पहिल्यांदा एसटी बस पोचली. (ST bus reached Bijapur first time after independence dhule news)

पंचायत समितीचे माजी उपसभापती ॲड. नरेंद्र मराठे यांच्या पाठपुराव्यातून ही बस सोमवारपासून सुरू झाली. छडवेल (प.) ता. साक्री ग्रामपंचायत अंतर्गत विजापूर पाडा येथे ७५ वर्षात एसटी बस पोचलेली नव्हती. दळणवळणाची सुविधा निर्माण व्हावी, ग्रामस्थांना तालुक्याच्या ठिकाणी पोचण्यासाठी, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ये-जा करण्यासाठी एसटी बस सुरू करावी, अशी ग्रामस्थांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती.

या मागणीची दखल घेत या गणाचे पंचायत समिती सदस्य तथा माजी उपसभापती ॲड. नरेंद्र मराठे यांनी वर्षभरापासून या पाड्यावर एसटी बस पोहोचावी यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला यश येऊन अखेर सोमवारी साक्री-छडवेल-विजापूर ही बस पहिल्यांदा सुरू झाली. साक्री आगारातूनही बस सुटत असताना यावेळी नारळ वाढवून तिचा प्रारंभ करण्यात आला.

ॲड. मराठे, आगारप्रमुख किशोर अहिरराव, विजापूर येथील ग्रामस्थ सदाशिव गोयकर, गोपा सूळ, भटू हलवर, येसा सूळ, भिला कुलाल, भटू सूळ, देवाजी सुळ आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. यावेळी बसवाहक तसेच चालकांचा सत्कार करण्यात आला. ठिकठिकाणी बसचे स्वागत करण्यात आले. ग्रामस्थांनी उत्साहात या बसमूधन प्रवास केला.

''ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी, तसेच विद्यार्थ्यांसाठी एसटी बस सुरू करावी, यासाठी विजापूर येथील ग्रामस्थांची सातत्याने मागणी होत होती. या मागणीच्या अनुषंगाने पाठपुरावा केला असता एसटी प्रशासनाने सहकार्य करत साक्री-छडवेल-विजापूर बससेवा सुरू केली आहे. या बसमुळे विजापूर तसेच या मार्गावरील सर्वच ग्रामस्थ, विद्यार्थ्यांची सोय होणार आहे.''- ॲड. नरेंद्र मराठे, माजी उपसभापती, पंचायत समिती. साक्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT