उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : सरकारकडून जनतेला योजनांच्या माध्यमातून भूलथापा : प्रा.शरद पाटील

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : केंद्र व राज्यातील सरकार बोलघेवड्या योजना घेऊन जनतेला भूलथापा देऊन दिशाभूल करीत आहे. ‘अच्छे दिन’चे स्वप्न गोरगरिबांना दाखवून सत्तेवर आल्यावर ते विसरले आहेत. आता राज्य सरकारने सरकारी शाळांचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. (statement of Prof Sharad Patil Govt misleads people through schemes nandurbar news )

शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य हमीभाव मिळत नाही. दुष्काळाचे संकट आहे. असे असताना केवळ योजनांची घोषणा करणाऱ्या सरकारकडून लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळत नाही, असा आरोप उबाठा शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी केला.

रनाळे येथे शिवसेने (उबाठा)तर्फे ‘केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा भांडाफोड करू या, बोलघेवड्या योजनांचा’ या विषयावर कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी प्रा. पाटील बोलत होते.

आमदार आमश्या पाडवी, जिल्हा समन्वयक दीपक गवते, सुनील सोनार, उपजिल्हाप्रमुख के. टी. गावित, रमेश पाटील, विजय ठाकरे, महानगरप्रमुख पंडित माळी, कैलास पाटील, छोटू पाटील, प्रमोद पाटील, भक्तवत्सल सोनार, डॉ. हेमंत शर्मा, बापू गिरासे, संजय राजपूत, आनंदा पाटील, गोटू पाटील, चुनीलाल पाटील, दीपक पाटील, राकेश चौधरी, राजू पठाण, योगेश सानप, बाबलू नागरे आदी उपस्थित होते.

केंद्र व राज्य सरकारच्या बोलघेवड्या योजनांवर चर्चा झाली. दीपक गवते म्हणाले, की भाजपच्या सरपंच काळात रनाळे गावात पंधरा-वीस दिवस उलटूनसुद्धा पाणी मिळत नाही. ग्रामपंचायतीमध्ये कुठलेही नियोजन नाही.

जिथे कूपनलिकेसाठी गाडी जात नव्हती, तेथेही आम्ही बोअरिंग केले आणि आता तापीमधून पाणी येणार असल्याचे बोलले जाते, पण कधी येणार हे माहीत नाही. पाण्यासाठी कुठलीही व्यवस्था नाही. अधिग्रहण नाही.

आमदार पाडवी म्हणाले, की नंदुरबार जिल्ह्यात १८ मोठी धरणे आहेत; परंतु त्या धरणातील पाण्याचा जिल्ह्याला फायदा होत नाही. तापी-बुराई योजनेसाठी लढा सुरू आहे; परंतु त्याकडे सरकार लक्ष देत नाही.

जिल्ह्यातून जाणाऱ्या तापी नदीवर बॅरेज असूनही त्याचा फायदा जिल्ह्याऐवजी गुजरातला होतो हे जिल्ह्याचे दुर्दैव आहे. तापी नदीतून पाणी कधी येणार, ती योजना कधी पूर्ण होणार हादेखील संशोधनाचा भाग आहे. गेल्या २३ वर्षांपासून तापी-बुराई सिंचन योजना रखडली आहे, याची खंत त्यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT