उत्तर महाराष्ट्र

Dhule News : बोरकुंडला कुंकू पुसणे, बांगड्या फोडण्याला तिलांजली! अंत्ययात्रेत खांदेकरी झाल्या सुना, बहिणी व मुली

पी. एन. पाटील

Dhule News : मरण आणि तोरण प्रसंगात अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी-परंपरांमुळे समाजाचे प्रचंड नुकसान होते. दुःखद प्रसंगात विधवा महिलेला अपमानास्पद वागणूक दिली गेल्याने महिलांचे खच्चीकरण व अपमान होतो.

या चुकीच्या रूढी-परंपरांमधून समाज मुक्त व्हावा यासाठी मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड सातत्याने प्रयत्न करत आहे. याची सुरवात धुळे जिल्ह्यातील बोरकुंड येथून करण्यात आली. (Stop wrong tradition in Dhule by Jijau Brigade news)

प्रगतिशील शेतकरी वसंतराव राघो भदाणे (वय ७९) यांच्या अंत्यविधीवेळी पुरुष खांदेकऱ्याऐवजी सून जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्षा माधुरी भदाणे, अनिता भदाणे, मुलगी जागृती सोनवणे, पुतणी डॉ. रोहिणी शिंदे, कृषी पर्यवेक्षक प्रियंका पाटील, नलिनी पाटील यांच्यासह बहिणी सिंधूबाई पवार, चित्राबाई सोनवणे, आशाबाई शिंदे, निर्मला सूर्यवंशी या महिला खांदेकरी झाल्यानंतर अंत्ययात्रा निघाली. वसंतराव भदाणे बोरकुंड येथील डॉ. राजेश पाटील यांचे बंधू, मराठा सेवा संघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष दीपक भदाणे, सामाजिक कार्यकर्ते योगेश भदाणे यांचे वडील व जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा माधुरी भदाणे व अनिता भदाणे यांचे सासरे होत.

जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश सदस्या सुलभा कुवर, जिल्हाध्यक्षा नूतन पाटील यांनी विधवा महिलांचे सौभाग्य अर्पण करून बांगड्या फोडून, कुंकू पुसून अपमान केला जात असल्याचे सांगितले. अशा चुकीच्या रूढी-परंपरा बंद करण्याची सुरवात आपल्या घरापासून करू या, असे त्या म्हणाल्या.

भदाणे कुटुंब आणि ग्रामस्थांनी सर्वानुमते या चांगल्या उपक्रमास प्रतिसाद दिला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

कोणतेही कर्मकांड कालबाह्य रूढी-परंपरा न करता पत्नी लता भदाणे यांच्या हस्ते पूजन करून जिजाऊ वंदनेने अंत्ययात्रेला सुरवात करण्यात आली. मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय, उत्तर महाराष्ट्र व धुळे जिल्हा पदाधिकारी यांच्यासह विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.

बोरकुंड येथे रविवारी (ता. १७) मरण आणि तोरण प्रसंगातील चुकीच्या प्रथा या विषयावर व्याख्यान, शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव आणि वृक्षारोपण होणार आहे.

अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी-परंपरा यामुळे मरण आणि तोरणप्रसंगी समाजाचे प्रचंड नुकसान होते. लग्नसमारंभात लग्न वेळेवर न लागणे, दारू पिवून नाचणे, प्री-वेडिंग यामुळे अनुचित घटना घडतात, तर दुःखद प्रसंगात विधवा महिलेला अपमानास्पद वागणूक दिली जाते. यामुळे महिलांची मोठ्या प्रमाणावर विटंबना, खच्चीकरण व अपमान होतो. यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून या चुकीच्या रूढी-परंपरा बंद कराव्यात, महिलांचा सन्मान करावा यासाठी समाजानेही पुढे यावे. -ॲड. पुरुषोत्तम खेडेकर, संस्थापक अध्यक्ष, मराठा सेवा संघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT