success story kalpesh suryawanshi got 320 rank in UPSC medical examination dhule news esakal
उत्तर महाराष्ट्र

UPSC Success Story : आईच्या स्वप्नाला यशाचा मुलामा! प्रतिकूल परिस्थितीवर मात करत डॉ. कल्पेशचे यूपीएसीत यश

सकाळ वृत्तसेवा

UPSC Success Story : येथील एका गरीब कुटुंबातील मुलाने प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणात उच्च शिखर गाठणारे मोठे यश मिळविले आहे. त्याने थेट एमडीचे शिक्षण पूर्ण करून यूपीएससीच्या वैद्यकीय परीक्षेतही ३२० रँकने देशपातळीवर आपले नाव कोरले आहे. त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

येथील राजेंद्र जगन्नाथ सूर्यवंशी आणि कल्पना राजेंद्र सूर्यवंशी (रा. दुसाणे, हल्ली सुरत, गुजरात) यांचा मुलगा डॉ. कल्पेश सूर्यवंशी याने हे दुहेरी यश प्राप्त केले असून, परिवारासाठी ही गर्वाची गोष्ट आहे. सुतार समाजात उच्च श्रेणीच्या पंक्तीत आज कल्पेशला स्थान मिळाले आहे. (success story kalpesh suryawanshi got 320 rank in UPSC medical examination dhule news )

कल्पेशने मेडिकल क्षेत्रातील दिल्ली येथील डॉ. राममनोहर लोहिया हॉस्पिटलमधून एमडीची उच्च पदवी घेऊन गुरू गोविंदसिंग इंद्रप्रस्थ विद्यापीठातून तिसरा आला. त्याचबरोबर UPSC-CMS (रॅंक ३२०)मध्येही घवघवीत यश मिळविले. लाखो विद्यार्थ्यांमधून ही अति कठीण परीक्षा तो उत्तीर्ण झाला. सुतार समाजाला गर्व वाटावा असे यश त्याने मिळविले आहे.

घरची परिस्थिती हलाखीची. वडिलांची वेल्डिंग कारखान्यात नोकरी, कसाबसा घरखर्च चालायचा. डोक्यावर तलवारीच्या धारेसारखे दु:ख; परंतु आर्थिक गरिबीच्या न्यूनगंडाची धूळ झटकून त्याखाली दडलेली श्रीमंत ऊर्जा प्रज्वलित होते.

हे कल्पेशची आई कल्पना यांना पक्के माहीत होते. कंबर कसून सुरतसारख्या शहरात आपले कर्तृत्व दाखवत किरकोळ कामे करीत राहिल्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आपल्या स्वप्नांना आकार देत, कुटुंबाला आर्थिक हातभार लावत, प्रसंगी नातेवाइकांकडून हातउसने घेऊन चारही मुला-मुलींना शिक्षण दिले. मोठे केले. आज तिच्या स्वप्नाला कल्पेशने सोन्याचा मुलामा चढविला आणि तिच्या मेहनतीला चकाकते केले.

प्रारंभी गरिबीचे सारखे पराभव पचवावे लागले तरी ताईंनी हिंमत सोडली नाही आणि म्हणून एक दिवस असाही उजाडला तिच्या कष्टाचा यशाचा आकडा उभा राहिला आणि आज ती एका एमडी डॉक्टरची आई झाली.

गरिबांची सेवा करणार ः डॉ. कल्पेश

पुढील काळात गोरगरीब, तसेच गावातील लोकांसाठी मोफत सेवा देण्याचे कल्पेशने ठरविले आहे. शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दादाभाऊ भदाणे, विश्वकर्मा संस्थेचे चंद्रकांत गवळी यांनी त्याचे कौतुक केले. डॉ. कल्पेश पत्रकार प्रा. सुकलाल सूर्यवंशी यांचा पुतण्या आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime : बीडमधून धक्कादायक बातमी..! गेवराईतील उपसरपंचाचा गोळीबारात मृत्यू, बार्शीतील सासुरे गावात कारमध्ये आढळून आला मृतदेह

Asia Cup 2025: "बिना मतलब का क्यों उंगली करें?" सूर्यकुमार यादवच्या विधानाने हश्या पिकला; Sanju Samson च्या प्रश्नावर म्हणाला, चिंता नसावी...

Nirmalya collection:'गणेशोत्सवात सातारा जिल्ह्यात १० टन निर्माल्य संकलन'; डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम; खतनिर्मितीच्या प्रक्रियेस सुरुवात

आता तू वाचत नाही! प्रियाचा जीव घेण्यासाठी महीपत इस्पितळात पोहोचला; नेटकरी म्हणतात- अरे काय टाइमपास लावलाय...

लालबाग राजाच्या विसर्जनावरून वाद, गुजराती कंपनीला कंत्राट दिलं म्हणणाऱ्याविरोधात मंडळ कोर्टात जाणार

SCROLL FOR NEXT