MLA Kunal Patil honoring disabled Suvarna Patil. esaka
उत्तर महाराष्ट्र

Success Story : बुररझडची दिव्यांग सुवर्णा पाटील अभ्यासाच्या व्यासंगातून बॅंक व्यवस्थापक!

जगन्नाथ पाटील

कापडणे (जि. धुळे) : नुकताच जागतिक अपंग दिन साजरा झाला. दिव्यांगांना बळकटी देण्यासाठी शासनाने मंत्रालयात स्वतंत्र विभाग सुरू केला आहे. त्यांच्या विकासासाठी आणि स्वतःच्या पायावर उभारी देण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. मात्र बुरझड येथील दिव्यांग सुवर्णा पाटील हिने आपल्या जिद्द, अभ्यासाचा व्यासंग आणि चिकाटीच्या बळावर बँकिंग क्षेत्रात दिव्य भरारी घेतली आहे.

त्यांनी राष्ट्रीयीकृत बॅंकेच्या मॅनेजर अर्थात व्यवस्थापकपदाच्या परीक्षेत भरारी घेतली आहे. त्या व्यवस्थापक म्हणून पात्र ठरल्या आहेत. पाचोरा (जि. जळगाव) शाखेत सहाय्यक व्यवस्थापक म्हणून निवड झाली आहे. (Success Story Suvarna Patil disabled person from Burrarzd bank manager through study Dhule news)

हेही वाचा : Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?

बुरझड (ता. धुळे) येथील गरीब कुटुंबातील सुवर्णा यादव पाटील हिच्या या यशामुळे अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत होत आहे. काँग्रेसचे राज्य कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते सुवर्णाचा नुकताच सत्कार करण्यात आला. या वेळी चिंचवारचे माजी सरपंच सोमनाथ पाटील, बुरझडचे सरपंच संतोष पाटील, माजी सरपंच जगन्नाथ जाधव, सडगावचे माजी सरपंच दादाजी पदमोर, दाजभाऊ पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य राजूभाऊ तावडे, सागर पाटील, शिवाजी पाटील, प्रवीण माळी, आर. डी. पाटील, आनंदा पाटील आदी उपस्थित होते. सत्कारप्रसंगी आमदार पाटील यांनी सांगितले, की पाटील यांनी दिव्य भरारी घेतली आहे. हे यश अनुकरणीय आहे. आयुष्यात खचून न जाता विजय मिळविता येतो, हे सिद्ध होते. तरुणांनी आदर्श घ्यावा. स्पर्धा परीक्षांचा ध्यास आणि अभ्यासाचा व्यासंग घेतला पाहिजे.

सुवर्णा पाटील यांनी यशाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. डोळ्यांचे अंधत्व असूनही वाचन अधिक आहे. वडिलांच्या प्रोत्साहनाने यश मिळविले आहे. धुळे शहरातील अंधशाळेत राहत, जिजामाता शाळेत माध्यमिक शिक्षण, विद्यावर्धिनी महाविद्यालयात उच्च शिक्षण, मोराणे येथे एमएसडब्ल्यू पूर्ण केले आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी दोन वर्षांपासून सुरू आहे. गरिबीच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी अभ्यास आणि चिकाटी महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT