Srikanth Dhiware, Kishore Kale and Beat Marshall participated in the QR code patrolling rally in the city.
Srikanth Dhiware, Kishore Kale and Beat Marshall participated in the QR code patrolling rally in the city. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : आता रोज 400 ठिकाणी ‘क्यूआर कोड’चे पेट्रोलिंग : पोलिस अधीक्षक धिवरे

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : नागरिकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने शहरात क्यूआर कोड पेट्रोलिंग सुरू केली आहे. या अनुषंगाने मंगळवारी (ता. ६) सायंकाळी नवीन ५५ दुचाकींसह बीट मार्शलची शहरातून रॅली काढण्यात आली. यादरम्यान क्यूआर कोड पेट्रोलिंगचे प्रात्यक्षिक करण्यात आले.

त्यात पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, पोलिस उपअधीक्षक एस. हृषीकेश रेड्डी, ‘एलसीबी’चे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्यासह अन्य पोलिस अधिकारी सहभागी झाले. (Superintendent of Police Dhiware statement patrolling for QR Code at 400 places every day dhule news)

बीट मार्शलद्वारे धुळे शहरात क्यूआर कोड पेट्रोलिंगचा प्रथमच उपक्रम राबविला जात आहे. नागरिकांनी या उपक्रमाला प्रतिसाद देऊन जिल्हा पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक धिवरे यांनी केले.

शहरात चौफेर अत्याधुनिक ५५ दुचाकींच्या पोलिस सायरनचा आवाज घुमल्याने नागरिकांचे लक्ष वेधले गेले. ही सुविधा नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आहे हा संदेश देण्यासाठी पोलिस अधीक्षक धिवरे यांच्या संकल्पनेतून ही अनोखी रॅली काढण्यात आली.

तीस बीट मार्शल

शहर उपविभागाच्या अखत्यारीतील धुळे शहर, आझादनगर, मोहाडी, चाळीसगाव रोड, देवपूर, पश्चिम देवपूर पोलिस ठाणे मिळून एकूण ३० बीट मार्शल तसेच प्रत्येक बीट मार्शलला दोन पाळ्यांमध्ये (शिफ्ट) १५ ते २० ठिकाणी क्यूआर कोड पेट्रोलिंग करतील.

शहर उपविभागातील विरळ वस्ती, बाजारपेठ, महामार्गालगत कॉलनी परिसर, पेट्रोलपंप, एटीएमची ठिकाणे, धार्मिक स्थळे, पुतळे, संवेदनशील ठिकाणे, कॉलनी परिसर, मिश्रित वस्ती भाग, बसस्थानक, रेल्वेस्थानक आदी विविध चारशे ठिकाणी पेट्रोलिंगदरम्यान रोज भेट देऊन क्यूआर कोड स्कॅनिंगद्वारे पेट्रोलिंग करतील.

ॲप विकसित

क्यूआर कोड स्कॅनिंगसाठी एक अ‍ॅप विकसित केले आहे. त्यात प्रत्येक क्यूआर कोड स्कॅनिंग झाल्यानंतर त्यांच्या नोंदी अ‍ॅपमध्ये होतील. त्या नोंदींमध्ये प्रत्येक बीट मार्शलने किती वाजता, कोणत्या ठिकाणी भेट दिली यांच्या नोंदी असतील.

पेट्रोलिंगची प्रत्येक नोंद जिल्हा नियंत्रण कक्ष, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय व पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना रोज दिसेल.

"क्यूआर कोड पेट्रोलिंगचा उपक्रम धुळ्यात प्रथमच राबविला जात आहे. त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचा मार्ग सुकर होईल. तसेच चोरी, घरफोडी व इतर अनुचित प्रकारांना आळा बसण्यास मदत होईल. नागरिकांनी क्यूआर कोडस्थळी पोलिसांनी राबविलेल्या उपक्रमास योग्य प्रतिसाद द्यावा, अशी अपेक्षा आहे." -श्रीकांत धिवरे, पोलिस अधीक्षक, धुळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: संसदेची सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी आजपासून CISF कडं!

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT