The staff were waiting for the late arrival at the office of the Superintendent of Police. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : कामावर उशिरा आलेल्या 10 लेट लतिफांना ‘दणका’; यांच्याकडून शिस्तीचा परिपाठएसपी धिवरे

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : नवनियुक्त पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलिस दलातील लेटलतीफ कर्मचाऱ्यांना पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर थांबविण्याचे सूत्र अवलंबिले आहे. त्यांनी प्रशासकीय कामकाजात शिस्तीचा परिपाठ कर्मचाऱ्यांमध्ये गिरविण्यास सुरवात केली आहे. (Superintendent of Police punished 10 officer who late in office dhule news)

श्री. धिवरे यांनी शुक्रवारी (ता. १) सकाळी कार्यालयात कामावर उशिरा आलेल्या दहा लेटलतीफ कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेरच थांबवून प्रशासकीय कामकाजाचे महत्त्व लक्षात आणून दिले. त्यांना समज देऊन कामावर हजर होण्याची सूचना दिली.

उशिरा आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना कार्यालयाचे दरवाजे बंद करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक धिवरे यांनी दिल्याने लेटलतीफ बाहेरच थांबले. त्यांना हे थांबणे ओशाळवाणे वाटले. पोलिस अधीक्षक धिवरे यांच्या अशा पावित्र्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले. श्री. धिवरे यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिस्तीचा परिपाठ निदर्शनास आणण्यावर भर देण्यास सुरूवात केली आहे.

वेळेची ही अपेक्षा...

पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या इमारतीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, वाचक शाखा, आस्थापना विभाग यांच्यासह अनेक विभाग आहेत. प्रत्येक विभाग स्वतंत्र असला तरी तो पोलिस अधीक्षकांच्या अधिपत्याखाली आहे. यापैकी सामान्यांसाठी दैनंदिन सेवा उपलब्ध करून देणाऱ्या विभागातील प्रमुखांसह अन्य कर्मचाऱ्यांची कार्यालयीन वेळेत उपस्थिती अनिवार्य असते.

शासकीय नियमानुसार सकाळी साडेनऊच्या आत कर्मचाऱ्यांनी कार्यालयात येणे अपेक्षित असताना काहीजण नेहमीप्रमाणे सकाळी दहानंतर कार्यालयात आले. मात्र, त्यांना तत्पूर्ती गेटबंदी करण्यात आली. पोलिस अधीक्षकांच्या आदेशावरून समज देत लेटलतिफांना कार्यालयात प्रवेश देण्यात आला.

शासनाने सर्व शासकीय कामकाजाची वेळ सुटी वगळता सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५, तर शिपायांसाठी हीच वेळ सकाळी ९.३० ते ६.३०, अशी बंधनकारक केली आहे. तसेच दुपारी एक ते दोन या वेळेत अधिकाधिक अर्धातास भोजनासाठी सुटी देण्यात आली आहे. ही वेळ पोलिस अधीक्षक कार्यालयात काटेकोर पाळली जावी, अशी सूचना अधीक्षक धिवरे यांनी कर्मचाऱ्यांना दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिवाळीत दिल्ली-NCRमध्ये हवा बनली विषारी, श्वास घेणंही कठीण; AQI ४००च्या वर, १२ कलमी अ‍ॅक्शन प्लॅन लागू

Solapur Accident: इंचगावजवळ अपघातात एक ठार, एक जखमी; पिकअपची दुचाकीला मागून धडक; राष्ट्रीय महामार्गावर घटना..

Ramraje Naik-Nimbalkar: आता लढायचं, पक्ष कुठला ते नंतर बघू: रामराजे नाईक-निंबाळकर; कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात नेमकं काय म्हणाले?

Minister Muralidhar Mohol: जैन बोर्डिंग व्यवहाराशी संबंध नाही: राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ; मी संस्थांमधून बाहेर पडल्यानंतर व्यवहार, नेमकं काय म्हणाले?

Maharashtra News : महाराष्ट्राला केंद्राकडून १५६६ कोटींची मदत; पूरग्रस्तांसाठी दिलासा

SCROLL FOR NEXT