Gram Panchayat esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : ग्रामसेवक ग्रामपंचायतींचे पाहतो कामकाज; गावकारभाऱ्यांची मुदत संपूनही प्रशासकाची नियुक्तीच नाही

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शिंदखेडा तालुक्यातील जानेवारी ते डिसेंबरअखेर १३ ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. २ जूनपर्यंत सात ग्रामपंचायतींची मुदत संपूनही प्रशासकाची नियुक्ती होत नसल्याने ग्रामपंचायतीचा आर्थिक व्यवहार थांबल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक कामकाज पाहत असून, त्यांना आर्थिक व्यवहार करता येत नाही. प्रशासक नियुक्तीबाबत प्रभारी गटविकास अधिकारी प्रदीप पवार यांनी २५ जुलैला जिल्हा परिषदेकडे पत्र पाठवूनही प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली नाही. (There is no appointment of administrator in gram panchayat after term of 7 village officials has expired dhule news)

शिंदखेडा तालुक्यातील जूनअखेर मुदत संपलेल्या तावखेडा (प्र.बेटावद), कदाणे, कंचनपूर, वाघोदे, परसामळ-कुमरेज गटग्रामपंचायत, साळवे व वालखेडा या ग्रामपंचायतींची मुदत संपून सव्वा महिना उलटला आहे.

मात्र अद्यापपर्यंत प्रशासकाची नियुक्ती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी न केल्याने ग्रामपंचायतीचे तात्पुरते कामकाज ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक पाहतात, पण आर्थिक व्यवहार करता येत नसल्याने अडचणीला तोंड द्यावे लागत आहे.

प्रशासाक नियुक्तीची प्रतीक्षा

जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा शिंदखेडा पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी प्रदीप पवार यांनी २५ ला जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना शिंदखेडा तालुक्यातील मुदत संपलेल्या सात ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणूक होण्याबाबत पत्रव्यवहार करून १५ दिवस होऊनही नियुक्ती करण्यात आली नसल्याने ग्रामस्थांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

जानेवारी ते डिसेंबरअखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती

ग्रामपंचायतीचे नाव मुदत संपण्याची तारीख

तावखेडा (प्र. बेटावद) १९ जून २०२३

वालखेडा १८ जुलै

कदाणे २० जुलै

कंचनपूर २३ जुलै

वाघोदे २५ जुलै

परसामळ-कुमरेज २५ जुलै

साळवे २५ जुलै

वाडी २३ डिसेंबर

होळ (प्र. बेटावद) २४ डिसेंबर

अंजनविहिरे २७ डिसेंबर

गव्हाणे-शिराळे २७ डिसेंबर

मांडळ २७ डिसेंबर

पथारे २८ डिसेंबर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT