police esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : या कारणामुळे साक्रीने अधिकाऱ्यांना पहाटेपर्यंत जागवले....

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शहरासह जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांपासून अनुचित आणि विचित्र घटना घडत असताना त्या पोलिसांनी कुशलतेने नियंत्रणात आणल्या. (trenches for 51 foot saffron flag was buried in open space by police dhule news)

असे असताना साक्री शहराने बुधवारी (ता. १४) मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत महसूल आणि पोलिस प्रशासनाला जागवले. साक्री शहरात मोकळ्या जागेत ५१ फुटी भगव्या ध्वजासाठी खोदण्यात आलेला खड्डा पहाटे तीननंतर बुजविण्यात आला.

संजय रामेश्‍वर शर्मा यांनी साक्री नगरपंचायत हद्दीतील एका मंदिराजवळील मोकळ्या जागेवर स्तंभासह ५१ फुटी भगवा ध्वज उभारणीसाठी तात्पुरती परवानगी मागितली. त्यानुसार साक्री नगरपंचायतीने अटी-शर्तीनुसार तात्पुरत्या स्वरूपात ना हरकत दाखला दिला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यात राज्य शासनाच्या नियम, अटींची पूर्तता करणे, मालकी हक्काबाबत वाद उद्‌भवल्यास ना हरकत संपुष्टात येणे, ना हरकत दाखला म्हणजे बांधकाम परवानगी नव्हे, ध्वज लावण्यापूर्वी साक्रीच्या पोलिस निरीक्षकांची पूर्वपरवानगी घेणे, पोलिस अधीक्षकांच्या प्रतिबंधात्मक मनाई आदेशाचे पालन करणे आदी विविध अटी-शर्ती घालण्यात आल्या.

या संदर्भात पडताळणी आणि विविध मुद्द्यांआधारे संबंधितांकडूनच स्तंभासाठी खोदण्यात आलेला खड्डा गुरुवारी पहाटे तीननंतर बुजविण्यात आला.

तहसीलदार आशा गांगुर्डे, पोलिस उपअधीक्षक साजन सोनवणे, साक्रीचे पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख, एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, निवासी नायब तहसीलदार राहुल मोरे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT