नंदुरबार : नंदुरबार शहरात नवापूर चौफुली परिसरात दोन जण कागदपत्र नसलेल्या मोटारसायकली कमी किमतीत विकण्यासाठी आले असता स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून दोघांना जाळ्यात अडकविले. त्यांच्याकडून दोन लाख ६५ हजार रुपये किमतीच्या सात मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. (Two bike thieves arrested big racket likely to be exposed Nandurbar Crime News)
हेही वाचा : Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’
पोलिसांना ३ डिसेंबरला गुप्त बातमी मिळाल्यानुसार नंदुरबार शहरात नवापूर चौफुली परिसरात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्या पथकाला नंदुरबार शहरातील नवापूर चौफुली परिसरात एका पानटपरीजवळ दोन व्यक्ती एका विनानंबर प्लेट असलेल्या मोटारसायकलसह दिसून आले. पथक त्यांच्याकडे जात असताना दोन्ही संशयितांनी पळ काढला. पथकाने पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले.
त्यांची नावे नीलेश हसीराम कोकणी (वय २२, रा. झामट्यावड, ता. नवापूर) व राकेश दिलवर कोकणी (२१, रा. बिजादेवी, ता. नवापूर, जि. नंदुरबार) अशी आहेत. त्यांनी मोटारसायकली सुमारे २० ते २५ दिवसांपूर्वी येथील जिल्हा रुग्णालय परिसरातून रात्रीच्या वेळी चोरी केल्याचे सांगितले. याबाबत नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडून गुजरातमधील मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड करण्यात आलेले आहेत वआणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उपविभागीय पोलिस अधीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील, हवालदार राकेश वसावे, पोलिस नाईक राकेश मोरे, मनोज नाईक, मोहन ढमढेरे, पोलिस अंमलदार अभय राजपूत, आनंदा मराठे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.