hit friend.jpg 
उत्तर महाराष्ट्र

"व्यवहार आमच्या दोघात आहे. त्यात तू बोलू नको"...उसनवारीतून मारहाण

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पेठरोडवरील शरदचंद्र मार्केटमध्ये उसनवारीच्या पैशांच्या व्यवहारातून बाचाबाची होऊन संशयितांच्या टोळक्‍याने दोघा भावांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे पंचवटी पोलिसात दाखल झाले आहेत.

झाले असे की...

संशयित गुलाम रसुल महंमद अहमद सिद्दीकी (30, रा. जीवन विकास सोसायटी, भाभानगर), अभिषेक जयेश पुरोहित (24), निसार हसर शिराजिद्दीन (25), रामप्रसाद प्रद्युमन बिंद (22), रमेश उदय प्रसादराव (37) अशी संशयितांची नावे आहेत. सतिश उर्फ पिंटू भृगनाथ गुप्ता (रा. कर्णनगर, पेठरोड) यांच्या फिर्यादीनुसार, जिनक पासवान यांच्यात उसनवारीच्या पैशांचा आर्थिक व्यवहार होता. ते पैसे घेण्यासाठी संशयित गुलाम सिद्दीकी आला असता, त्यावेळी सतिश गुप्ता यांनी, सदरचा व्यवहार आमच्या दोघात आहे. त्यात तू बोलू नको असे सांगितले. त्याचा संशयितास राग आला आणि त्याने गेल्या रविवारी (ता.22) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास आणखी साथीदारांना गोळा करून आणले आणि सतिश व मंगेश गुप्ता या दोघा भावांना शिवीगाळ करीत लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली.

तसेच, लाकडी दांडक्‍याने मारून संशयितांनी मंगेश गुप्ता याच्या दोन्ही हाताचे हाड मोडले. तर, गुलाम सिद्दीकी याच्या फिर्यादीनुसार, संशयित सतिश गुप्ता याच्याकडे प्लॅस्टिक विक्रीच्या उधारीचे पैसे मागितले असता त्याचा राग येऊन संशयित सतिश गुप्ता (40), मंगेश गुप्ता (28), सुरेश गुप्ता (22), धर्मेंद्र गुप्ता (19), विवेक झा (18) यांनी शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. याप्रकरणी पंचवटी पोलिसात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक उपनिरीक्षक शिंदे तपास करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार; विदर्भ-मराठवाड्यासह २९ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Chana Moong Dal Chilla: हेल्दी नाश्ता म्हणजे बेचव नाही! असा बनवा चणे-मूग चिला! खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

आजचे राशिभविष्य - 23 सप्टेंबर 2026

Azamgarh Hostage Crisis : आझमगढ हादरलं! आधी पत्नी अन् दोन पुजाऱ्यांची हत्या, मग मुलावर झाडली गोळी; ८ तासांच्या ऑपरेशननंतर आरोपीचा एन्काउंटर

Sangli ACB Trap : भूमी अभिलेखमधील दोघे लाच घेताना जाळ्यात; ईश्‍वरपुरात रचला सापळा, प्रॉपर्टी कार्डावर क्षेत्र दुरुस्तीसाठी घेतले 50 हजार

SCROLL FOR NEXT