Assistant Inspector Suresh Shirasat and colleagues while inspecting the seized car.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime : मुंबईच्या दोघांना 20 किलो गांजासह अटक

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मध्य प्रदेशाकडे गांजाची तस्करी करताना मुलुंड (मुंबई) येथील दोघांना स्विफ्ट कारसह सांगवी पोलिसांनी अटक केली.

सोमवारी (ता. १५) केलेल्या या कारवाईत १९ किलो ७०० ग्रॅम गांजा व मारुती स्विफ्ट कार असा एकूण सहा लाख ९७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला. (Two people from Mumbai arrested with 20 kg ganja dhule news)

गांजाच्या वाहतुकीबाबत सांगवी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सुरेश शिरसाट यांना माहिती मिळाली होती. त्यांनी सहकाऱ्यांसह हाडाखेड (ता.शिरपूर) येथील सीमा तपासणी नाक्यावर नाकाबंदी केली. मध्य प्रदेशाकडून शिरपूरच्या दिशेने येणाऱ्या चारचाकीला (एमएच ०३, सीपी ५८६३) संशयावरून पोलिसांनी थांबवले.

वाहनाची झडती घेतली असता चालकाच्या मागील सीटवर पांढऱ्या पोत्यात गुंडाळलेला गांजा आढळला. त्याचे वजन १९ किलो ७०० ग्रॅम भरले. पोलिसांनी वाहनासह दोन संशयितांना सांगवी पोलिस ठाण्यात नेले. संशयितांमध्ये चालक रज्जाक मेगदाद शेख (वय ५४, रा.सिंधी कॉलनी, मुलुंड कॉलनी, मुंबई), विनोद रमेश शर्मा (वय ३३, रा.मुलुंड पश्चिम, मुंबई) यांचा समावेश आहे. विनोद शर्मा रिक्षाचालक आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

संशयित गांजा कोठून व कोणासाठी घेऊन चालले होते याचा तपास पोलिस करीत आहेत. पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी अन्साराम आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सुरेश शिरसाट, उपनिरीक्षक सुनील वसावे, हवालदार संजय सूर्यवंशी, पवन गवळी, मंगेश मोरे, जाकिर शेख, संदीप शिंदे, सागर ठाकूर, मनोज नेरकर, शिवाजी वसावे, जयेश मोरे, भगवान गायकवाड, कृष्णा पावरा, संतोष पाटील, मनोज पाटील, इसरार फारुकी यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

SCROLL FOR NEXT