kirtan.jpg 
उत्तर महाराष्ट्र

अखंड हरिनाम सप्ताह सुरू होता...जोरदार आवाज झाला.. ग्रामस्थांनी पाहिल्यावर धक्काच....

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जाखोरी शिवारात दारणा नदीच्या पुलावरून भरधाव वाहनाने मंगळवारी (ता. 31) रात्री जोरदार धडक दिल्याने दोन जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर नाशिक रोडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

अशी घडली घटना...

जाखोरीत अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून, मंगळवारी रात्री ग्रामस्थ रमले होते. त्याचवेळी अपघाताच्या आवाजाने जाखोरीच्या दारणा नदीच्या पुलाकडे ग्रामस्थांनी धाव घेतली. त्यावेळी गावातील बाळासाहेब दत्तात्रेय खाडे व सोमनाथ नारायण खाडे हे दोघे युवक गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले. विश्‍वास कळमकर, राहुल धात्रक आदींनी तत्काळ त्यांना रुग्णालयात हलविले. हे दोघे युवक चालत येत असताना शिंदे गावाच्या दिशेने सुसाट आलेल्या मारुती ओम्नी कारने त्यांना उडविले. वाहनचालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवित असल्याने त्याला वाहनावर ताबा मिळविता येत नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात मद्यधुंद अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT