umbrellas & Raincoat esakal
उत्तर महाराष्ट्र

यंदा छत्र्या, रेनकोटही महाग; किमतीत 20 टक्क्यांपर्यंत वाढ

रमाकांत घोडराज

धुळे : पावसापासून संरक्षणासाठी छत्र्या (Umbrella), रेनकोटची (Rain Coat) खरेदी मोठ्या प्रमाणात होते. धुळ्यात सध्याचा पावसाची प्रतीक्षा असली तरी बाजारात विविध रंग आणि आकाराच्या छत्र्या तसेच रेनकोटही दाखल झाले आहेत. छत्र्या, रेनकोटच्या खरेदीसाठी मात्र नागरिकांच्या खिशावर यंदा तुलनेने अधिक बोजा पडत आहे. यावर्षी छत्र्या, रेनकोटच्या किमतीत १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. असे असले तरी खरेदी मात्र होत आहे, पावसाला सुरवात झाल्यानंतर यात पुन्हा वाढ होणार आहे. (Umbrellas raincoats are expensive Increase in price up to 20 percent Dhule news)

यंदा धुळ्यात पावसाने हजेरी लावली खरी पण त्यानंतर हुलकावणी देणे सुरू आहे. आता जून संपायला आला तरी प्रतीक्षा कायम आहे. पाऊस असला तरी नोकरदार, छोटे-मोठे व्यावसायिक, विक्रेते, विद्यार्थी अशा सर्व घटकांना कामानिमित्त घराबाहेर पडावेच लागते. त्यामुळे पावसात भिजू नये यासाठी छत्री, रेनकोट सोबत घ्यावेत लागतात. त्यामुळे यंदाही छत्र्या, रेनकोट आदी साहित्य बाजारात दाखल झाले आहे. काही दिवसांपूर्वीच शाळा सुरू झाल्याने बऱ्याच जणांनी पाठ्यपुस्तके, वह्या खरेदी करताना आपल्या मुलांसाठी रेनकोटही खरेदी केले आहेत. काहीजण खरेदी करत आहेत तर काहीजण पाऊस नसल्याने छत्र्या, रेनकोट खरेदीपासून सध्या दूर आहेत. मात्र, पाऊस एकदाचा सुरू झाला की पुन्हा दुकानांमध्ये गर्दी होणार आहे.

रंगीबेरंगी आणि नावीन्यपूर्ण छत्र्या बाजारात दाखल झाल्या आहेत. यात अगदी पर्समध्ये सहज ठेवता येईल अशा दोन- तीन घडीच्या छत्र्या आकर्षण ठरत आहेत. तरुणींसाठी झालर छत्र्यांचा ट्रेंड आहे. जुन्या काळातील लांब, आजोबांच्या काठीसारख्या छत्र्यांनादेखील अजूनही मागणी आहे. लहान मुलांसाठी ८० ते १५० रुपये, मोठी छत्री १२० ते ३०० रुपयांपर्यंत आहेत. विविध व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांसाठी सातशे ते दोन हजार रुपयांपर्यंत छत्र्या उपलब्ध आहेत.

रेनकोटच्या व्हयराटी

वाहतूक खर्च व इतर साहित्य महाग झाल्याने यंदा मात्र छत्र्या, रेनकोटच्या किमती १५ ते २० टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा छत्र्यांसह रेनकोटला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तरुण मंडळींसाठी वॉटर प्रिंट, ट्रान्सपरंट, चेन, मिड टॉप, लाँग टॉप आदी रेनकोट उपलब्ध आहे. पँट-शर्ट, पॅराशूट, नायलॉन आणि ट्रान्सपरंट आदी प्रकारही दाखल आहेत. अम्ब्रेला, लाँग कोट, टॉप विथ स्कर्ट आदींना तरुणाई पसंती देत आहे. बाजारात ब्रँडेड रेनकोटही उपलब्ध आहेत. लहान मुलांचे रेनकोट २०० ते २५० रुपये, महिलांसाठी २५० ते ८०० तर पुरुषांसाठी ५०० ते १५०० रुपयांपर्यंत रेनकोट उपलब्ध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral: आईsss शप्पथ... हा तर स्विंगचा किंग! याच्या गोलंदाजीचा सामना करताना भल्याभल्यांना फुटेल घाम...

Dhule Municipal Election : धुळ्यात मतदानापूर्वीच भाजपचा गुलाल! दोन महिला उमेदवार बिनविरोध; विरोधकांना मोठा धक्का

Narayangaon Protest : जीवघेणी बेकायदेशीर ऊस वाहतूक कधी थांबणार; डिसेंबर महिन्यात दोन महिलांचा मृत्यू; धनगरवाडी येथे रास्ता रोको आंदोलन!

Hindu Killed in Bangladesh : बांगलादेशात आणखी एका हिंदू व्यक्तीची धारदार शस्त्रांनी हत्या अन् पेट्रोल टाकूनही जाळलं!

Latest Marathi News Live Update : एरंडोल नगरपालिका निवडणुकीत पाच अविवाहित युवकांचा विजय

SCROLL FOR NEXT