Damage to wheat crop due to unseasonal rains.
Damage to wheat crop due to unseasonal rains. esakal
उत्तर महाराष्ट्र

Unseasonal Rain : सोनूशेलूसह परिसरात अवकाळीमुळे रब्बीचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

निमगूळ (जि. धुळे) : सोनशेलू (ता. शिंदखेडा) व परिसरात शनिवारी साडेनऊच्या सुमारास अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली.

यात वादळी वारे, विजांचा कडकडाट, व जोरदार पावसाने गहू, हरभरा,ज्वारी, मका या काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. (Unseasonal rain Rabi losses due to bad weather in area including Sonshelu dhule news)

शेतकऱ्यांच्या तोंडाशीत आलेला घास अवकाळी पावसाने हिरावल्यामुळे शेतकऱ्यांचे अश्रू अनावर झाले आहेत. काढलेला माल व गुरांसाठी जमा केलेला चारा हादेखील ओला झाल्याने तो झाकण्यासाठी शेतकऱ्यांची रात्री एकच धांदल उडाली.

अगोदरच कमी पावसामुळे खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते, पण अवकाळी पाऊस आल्यामुळे रब्बी हंगामातदेखील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

या नुकसानामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी सोनशेलू सरपंच प्रतिनिधी धीरज बडगुजर यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT