Dhule News : महापालिकेतर्फे डेडरगाव जलशुद्धीकरण केंद्रात १९ व २० जुलैला दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.
या कामामुळे मोहाडी (पिराची टेकडी) पंपिंग स्टेशन, मालेगाव जलकुंभ, चक्करबर्डी जलकुंभ या जलकुंभावरून दोन दिवस उशिरा पाणीपुरवठा होणार आहे. (Water supply will be delayed for 2 days in some parts of Dhule news)
धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या डेडरगाव जलशुद्धीकरण केंद्रातील क्लॅरिफॅक्युलेटरमधील गाळ काढण्याचे तसेच ब्रिज दुरुस्तीचे काम महापालिकेतर्फे करण्यात येणार आहे. या कामामुळे १९ व २० जुलैला पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
त्यामुळे धुळे शहरातील मोहाडी पंपिंग स्टेशन, मालेगाव जलकुंभ, चक्करबर्डी जलकुंभ येथून ज्या भागाला पाणीपुरवठा होतो, त्या भागाला नियोजित वेळापत्रकापेक्षा दोन दिवसाने उशिराने पाणीपुरवठा होईल असे महापालिकेने दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
संबंधित भागातील नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन धुळे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. गेल्या काही दिवसांपासून महापालिकेकडून शहराला पाणीपुरवठा करणारे जलशुद्धीकरण केंद्रातील गाळ काढणे, जलकुंभांची साफसफाई आदी कामे हाती घेतली आहेत.
काही दिवसांपूर्वी हनुमान टेकडी जलशुद्धीकरण केंद्रातील गाळ काढण्यात आला होता. पावसाळ्यात व पावसाळ्यापूर्वी जलशुद्धीकरण केंद्रातील क्लॅरीफॅक्युलेटरमध्ये तसेच जलकुंभांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचला. यामुळे दूषित पाण्यासह एकूणच पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम होतो. ही कामे झाल्यानंतर ही समस्या दूर होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.