accident news esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Accident News : डोक्यावरून गेले चाक; महिलेचा जागीच मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

Dhule Accident News : रावेरहून (ता. धुळे) शहराकडे येणाऱ्या दुचाकीने समोरील ट्रेलरला धडक दिली. त्यात दुचाकीवरील महिला रस्त्यावर पडली.

तिच्या डोक्यावरून ट्रेलरचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. १९) सकाळी घडली. (woman died on spot in bike trailer accident dhule news)

सचिन संतोष महाजन (रा. रावेर, ता. धुळे) पत्नी गायत्री (वय ३०) हिच्यासह दुचाकीने (एमएच १९ बीझेड ०२१९) रावेरहून धुळ्याकडे येत होते.

पारोळा रोडवरील एका हॉटेलजवळ सचिन महाजन यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ते ट्रेलरला (जीजे १२ बीआय ३३२०) धडकले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या अपघातात दुचाकीवरील गायत्री महाजन रस्त्यावर पडल्या. त्यावेळी ट्रेलरच्या मागचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

याबाबत माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद पाटील, अनिल महाजन, दिनेश देवरे, प्रमोद पाटील, संतोष वाघ व बाळापूरचे पोलिस पाटील राहुल पाटील घटनास्थळी दाखल झाले. याबाबत धुळे तालुका पोलिस ठाण्यात नोंद झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Decision Impact: ट्रम्पचा डाव उलटणार? TCS, Infosys, Wiproसह भारतीय IT कंपन्यांना झटका देताना अमेरिकाच अडचणीत?

Ranji Trophy : रवींद्र जडेजाचे खणखणीत शतक, रिंकू सिंगनेही पार केला तिहेरी आकडा; दोघांची फटकेबाजी अन् प्रतिस्पर्धी गार...

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींचा ज्ञानेश कुमार यांना इशारा; म्हणाले, ‘तुमची झोप उडाली आहे, आम्ही तुम्हाला सोडणार नाही’

Indian Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची मोठी संधी! ३,५४८ जागा; कोण अर्ज करू शकतं जाणून घ्या

भाजप नेत्याची काठ्या-दगडांनी मारहाण करत हत्या, ५-६ जणांनी घेरलं अन्....; धक्कादायक VIDEO समोर

SCROLL FOR NEXT