woman doctor died on spot after Eicher overturned dhule accident news  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Accident News : आयशर उलटल्याने सोनगीरच्या डॉ. सोनवणेंचा अपघाती मृत्यू; सारेच हळहळले

सकाळ वृत्तसेवा

Dhule Accident News : स्कूटीवर जाणाऱ्या महिला डॉक्टरवर भरधाव आयशर उलटल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता.८) सकाळी दहाच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गावर सरवड (ता. धुळे) फाट्याजवळ घडली.

डॉ. आदिती जोगळेकर- सोनवणे (३५, रा. धुळे) असे मृत महिलेचे नाव असून त्या येथील ग्रामीण रुग्णालयात दंतचिकित्सक म्हणून कार्यरत होत्या. स्कुटीने रूग्णालयात कर्तव्यावर येत होत्या. (woman doctor died on spot after Eicher overturned dhule accident news)

डॉ. जोगळेकर- सोनवणे दुचाकीने (एमएच 18 / बीव्ही 0751) धुळ्याहून सोनगीरला येत होत्या. त्याचवेळी सरवड फाट्याजवळ मागून भाजीपाला भरलेला आयशर ट्रक (आरजे 12 / जीबी 8160) डॉ. जोगळेकर यांच्या दुचाकीवर उलटला. यात त्या गंभीररीत्या जखमी झाल्या. स्थानिकांनी त्यांना आयशर खालून बाहेर काढले व रुग्णवाहिकेचे धुळ्याला रवाना केले.

मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अपघाताचे वृत्त समजताच सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश फड, हवालदार सूरजकुमार साळवे, विजयसिंग पाटील, संजय जाधव दाखल झाले. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त आयशर बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

उत्कृष्ट सेवा देणाऱ्या हसतमुख दंतचिकित्सक डॉ. जोगळेकर यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे समजताच गावात शोककळा पसरली. येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी एवढेच नव्हे तर रुग्णांनादेखील अश्रू अनावर झाले होते. धुळ्याचे दंतरोग तज्ज्ञ डॉ. मनोज सोनवणे हे डॉ. जोगळेकरांचे पती असून त्यांना लहान मुलगी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT