Molestation  esakal
उत्तर महाराष्ट्र

शेतजमीनीच्या वादातून महिलेचा विनयभंग

भगवान जगदाळे

निजामपूर (जि. धुळे) : शेतजमीनीच्या वादातून जैताणे (ता. साक्री) येथील ४५ वर्षीय पीडित महिलेचा विनयभंग झाला. याप्रकरणी जैताणेच्या सरपंच व माजी पंचायत समिती सदस्यासह चार संशयितांविरुद्ध निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, या हायव्होल्टेज ड्रामामुळे जनसामान्यांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.

पीडित महिलेची रोजगाव शिवारात शेती असून, सुमारे एक महिन्यापूर्वी त्यांनी शेतीची नांगरणी केली होती. त्यांच्या शेतात रोटा का मारला, याचा जाब विचारण्यासाठी पीडित महिला गुरुवारी (ता. १९) सायंकाळी पाचच्या सुमारास अशोक मुजगे यांच्या घरासमोर गेली असता, अशोक मुजगे, दिलीप मुजगे, सागर मुजगे यांनी ती जमीन आमची असून, तुमचा काहीएक संबंध नाही, असे पीडितेस सांगितले व दिलीप मुजगे याने पीडितेचा हात धरून विनयभंग (Molestation) करून हाताबुक्क्यांनी मारहाण केली, तर अशोक मुजगेने शिवीगाळ करून पीडित महिलेस धमकीही दिली. सागर मुजगे यानेही अंगावर धावून येत पीडितेचा उजवा हात धरून पिरगळून दिला. कविता मुजगेनेही त्यांना शिवीगाळ केली.

दरम्यान, घटनास्थळी पीडितेस अपरिचित असलेले बहुतेक लोक उपस्थित होते. संबंधित लोकांनी सोडवासोडव केल्यानंतर घरी येऊन पीडितेने पती व मुलाला फोन लावला. सांयकाळी सातला ते घरी आल्यावर त्यांना सोबत घेऊन पीडितेने पोलिस ठाणे गाठले. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून अशोक मुजगे, दिलीप मुजगे, सागर मुजगे व कविता मुजगे या चारही संशयितांविरोधात निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिस उपनिरीक्षक दीपक वारे तपास करीत आहेत.

शनिवारी (ता. २१) सायंकाळी फिर्यादी व संशयितांना निजामपूर पोलिस ठाण्यात बोलावून कलम १४९ अन्वये नोटिसा देऊन प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. फिर्यादी व संशयितांनी कायदा हातात घेऊन आपापसात भांडण न करता भूमिअभिलेख विभागाकडून जागेची मोजणी करून घ्यावी अथवा न्यायालयाकडून दाद मागावी, अशी समज दिल्याचे सहाय्यक निरीक्षक श्रीकांत पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT