Uttar Pradesh Assembly Election 2022

‘लडकी हू लड सकती हू’च्या पोस्टर गर्ल भाजपकडून लढणार; काँग्रेसला धक्का

सकाळ डिजिटल टीम

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी काँग्रेसच्या आणखी एका पोस्टर गर्लने काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सुप्रसिद्ध काँग्रेस नेत्या पल्लवी सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर पल्लवीने मोठा आरोप केला होता. पल्लवी सिंग (Pallavi Singh) ही ‘लडकी हू लड सकती हू’ मोहिमेतील एक प्रमुख चेहरा होती. त्यांच्या जाण्याने काँग्रेसला तिसऱ्यांदा मोठा धक्का बसला आहे. (Pallavi Singh join BJP)

याआधी काँग्रेसच्या (Congress) दोन पोस्टर गर्ल्स पक्ष सोडून भाजपमध्ये दाखल झाल्या आहेत. तीन दिवसांपूर्वी वंदना यांनी काँग्रेस (Congress) सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. जुन्या कार्यकर्त्यांपेक्षा पक्षात नव्या चेहऱ्यांना प्राधान्य दिल्याने त्या नाराज होत्या. प्रियांका गांधी पक्ष कार्यकर्त्यांना भेटायला वेळ देत नाहीत. दोन वर्षांपासून मी त्यांना भेटू शकलेली नाही, असे वंदना यांनी भाजपमध्ये आल्यानंतर म्हटले होते. ‘लडकी हू लड सकती हू’ या मोहिमेची पोस्टर गर्ल प्रियांका मौर्याने यापूर्वीच काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तिकीट न मिळाल्याने त्या नाराज होत्या.

तिकीट न मिळाल्याने संतापलेल्या वंदना सिंह यांनी टीव्ही चॅनलशी संवाद साधताना सांगितले की, पाच ते सहा वर्षांपासून मी काँग्रेसमध्ये (Congress) सक्रिय आहे. पदाधिकारी आहे. मी महिला मोर्चाची प्रदेशाध्यक्ष आहे. प्रियांका गांधी (priyanka Gandhi) म्हणाल्या होत्या की, ४० टक्के महिलांना संधी दिली जाईल. त्यामुळे मलाही संधी दिली जाईल असे वाटले होते. परंतु, तसे झाले नाही. पक्षाने जुन्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करून काही दिवसांपूर्वीच पक्षात आलेल्या लोकांना तिकीट दिल्याचे वंदना म्हणाल्या होत्या.

पक्षाचा झेंडा कोणीही उंचावणार नाही

जुन्या लोकांची अशीच अवहेलना केली तर पक्षाचा झेंडा कोणीही उंचावणार नाही. राजीनामा देण्यापूर्वी प्रियांका गांधी यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, पण वेळ देण्यात आली नाही. दोन वर्षांपासून प्रियांका गांधींना (priyanka Gandhi) भेटू शकलेले नाही, असे वंदना म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Latest Marathi News Updates: शिवसेना नेत्या शायना एनसी यांनी उज्ज्वल निकम यांचे केले अभिनंदन

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

SCROLL FOR NEXT